जया बच्चन ‘या’ कारणामुळे तिरस्कार करतात, माझ्या खासगी आयुष्यात….

एक व्हिडीओ सातत्याने व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून कोणाचाही पारा नक्कीच चढणार.

जया बच्चन या कारणामुळे तिरस्कार करतात, माझ्या खासगी आयुष्यात....
| Updated on: Oct 23, 2022 | 7:25 AM

मुंबई : जया बच्चन (Jaya Bachchan) गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सातत्याने व्हायरल होतोय. हा व्हिडीओ (Video) पाहून कोणाचाही पारा नक्कीच चढणार, यामुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर जया बच्चन आहेत. या वयात असे बोलणे शोभते का? असा प्रश्न सातत्याने जया बच्चनला विचारण्यात येतोय. जया बच्चन या त्यांच्या बिनधास्त शैलीमुळे ओळखल्या जातात. परंतू त्यांचा हा व्हिडीओ चाहत्यांना देखील अजिबात आवडला नाहीये. यावर आता स्वत: जया बच्चन यांनीच स्पष्टीकरण (Explanation) दिले आहे.

विमानतळावर काही फोटोग्राफर्स जया बच्चन यांचे फोटो आणि व्हिडीओ काढत होते. यादरम्यान एक फोटोग्राफर्स पडता पडता वाचला. हे पाहून जया बच्चन म्हणाल्या की, तू अजून दोन वेळा पडायला हवा…जया बच्चनचे हे शब्द ऐकून सर्वचजण आर्श्चयचकित झाले. हा सर्व प्रकार कॅमेरामध्ये कैदा झाला आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतोय.

या व्हिडीओमुळे जया बच्चन यांना ट्रोल मोठ्या प्रमाणात केले जात आहे. ‘व्हॉट द हेल नव्या’ या आपल्या नातीच्या शोमध्ये याबद्दल आता जया बच्चन यांनी खुलासा केलाय. जया बच्चन म्हणाल्या की, माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारणारे आणि खोटे बोलून पोट भरणारे लोक मला आवडत नाहीत.

फोटोग्राफर्सला बघितले की, माझा पारा चढतो. यामुळेच मी त्यांना नेहमी म्हणते की, तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्ही माझ्या चित्रपटाविषयी बोला. मी एखाद्या चित्रपटामध्ये काम केले आणि तुम्हाला माझा अभिनय आवडला नाही. त्यावर तुम्ही बोला. मला अजिबात राग येणार नाही. पण माझ्या वैयक्तिक आयुष्यात दखल दिलेली मला आवडत नाही.