Deepika Padukone: दीपिकाच्या हृदयाचे ठोके वाढले; शूटिंग अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर

दीपिका सध्या हैदराबादमधल्या रामोजी फिल्म सिटीमध्ये 'प्रोजेक्ट के' या आगामी चित्रपटाचं शूटिंग करत आहे. शूटिंगदरम्यान अचानक हृदयाचे ठोके (heart rate) वाढल्याने दीपिकाला अस्वस्थ वाटू लागलं. शूटिंग अर्धवट सोडून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Deepika Padukone: दीपिकाच्या हृदयाचे ठोके वाढले; शूटिंग अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर
Deepika Padukone
Image Credit source: Facebook
| Edited By: | Updated on: Jun 15, 2022 | 11:51 AM

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची (Deepika Padukone) तब्येत अचानक बिघडल्यामुळे तिला हैदराबाद (Hyderabad) इथल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता तिची प्रकृती सुधारली असून ती पुन्हा सेटवर कामासाठी परतल्याची माहिती आहे. दीपिका सध्या हैदराबादमधल्या रामोजी फिल्म सिटीमध्ये ‘प्रोजेक्ट के’ या आगामी चित्रपटाचं शूटिंग करत आहे. शूटिंगदरम्यान अचानक हृदयाचे ठोके (heart rate) वाढल्याने दीपिकाला अस्वस्थ वाटू लागलं. शूटिंग अर्धवट सोडून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून ती सेटवर परतली आहे.

गेल्या काही दिवसांपासून दीपिकाच्या कामाचं शेड्युल अत्यंत व्यग्र असल्याने तब्येत बिघडल्याचं म्हटलं जातंय. ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये दीपिका परीक्षक म्हणून सहभागी झाली होती. कानवरून परतताच तिने लगेच शूटिंगला सुरुवात केली. या सर्व घडामोडींदरम्यान तिला पुरेसा आराम मिळाला नाही. दीपिका रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती मिळताच चाहत्यांनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली. मात्र थोड्या वेळानंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तिने पुन्हा चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.

इन्स्टा पोस्ट-

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातही ती पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार असल्याचं कळतंय. इतकंच नव्हे तर पती रणवीर सिंगच्या ‘सर्कस’ या चित्रपटातही ती पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे. ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटात दीपिकासोबत ‘बाहुबली’ स्टार प्रभास आणि महानायक अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. आगामी काळात ती शाहरुख खानसोबत ‘पठाण’ आणि हृतिक रोशनसोबत ‘फायटर’ या चित्रपटातदेखील झळकणार आहे.