श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचे मोठे स्टेटमेंट

| Updated on: Nov 17, 2022 | 4:11 PM

या घटनेनंतर संपूर्ण देशात संपातची लाट निर्माण झालीये. प्रत्येकजण या हत्याकांडचा निषेध करताना दिसतोय.

श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचे मोठे स्टेटमेंट
Follow us on

मुंबई : श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात दररोज वेगवेगळे खुलासे केले जात आहेत. या हत्याकांडनंतर संपूर्ण देश हादरून गेलाय. श्रद्धा वालकर आणि आफताब पुनावाला हे दोघे काही दिवसांपासून दिल्ली येथे लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र, आफताबने एका वादानंतर श्रद्धाची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. श्रद्धा ही मुळ मुंबईतील होती. आफताब याने श्रद्धाच्या शरीराचे तब्बल 34 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले होते. या घटनेनंतर संपूर्ण देशात संपातची लाट निर्माण झालीये. प्रत्येकजण या हत्याकांडचा निषेध करताना दिसतोय.

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा कायमच चर्चेत असतात. श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात आता राम गोपाल वर्मा यांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत संपात व्यक्त केलाय. आता काम गोपाल वर्मा यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

राम गोपाल वर्मा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, श्रद्धाने एक आत्मा म्हणून परत यावे आणि त्याचे 70 तुकडे करावेत. एवढेच नाही तर पुढे अजून एक ट्विट करत राम गोपाल वर्मा म्हणाले की, फक्त कायद्याच्या भीतीने निर्घृण हत्या थांबवता येत नाहीत…

पण जर पीडितेच्या आत्म्याने परत येऊन आपल्या मारेकऱ्यांना ठार मारले तर ते नक्कीच थांबवता येतील..मी देवाला विनंती करतो की हे थांबवावे, कृपया विचार करून आवश्यक ती कारवाई करावी. आता राम गोपाल वर्मा यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

राम गोपाल वर्मा यांच्या या पोस्टवर युजर्स मोठ्या प्रमाणात कमेंट देत, राम गोपाल वर्मा यांच्या या पोस्टचे समर्थन करताना दिसत आहेत. यापूर्वी बाॅलिवूडमधील अनेक कलाकारांनी या हत्येचा निषेध नोंदवला होता. यामध्ये स्वरा भास्कर हिने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती.