गोविंदाही पडला ‘श्रीवल्ली’च्या प्रेमात पाहा सामी-सामी गाण्यावरील जबरदस्त डान्स….

विशेष म्हणजे गोविंदाने साऊथची प्रसिद्ध स्टार अभिनेत्री रश्मिका मंदान्नासोबत सामी सामी गाण्यावर डान्स केलाय.

गोविंदाही पडला श्रीवल्लीच्या प्रेमात पाहा सामी-सामी गाण्यावरील जबरदस्त डान्स....
| Updated on: Sep 25, 2022 | 9:44 AM

मुंबई : अल्लू अर्जुन(Allu Arjun)च्या पुष्पा द राइज (Pushpa the Rise) या चित्रपटातले ‘सामी सामी’ (Sami Sami) हे गाणे सोशल मीडियावर चर्चेत आहे. बाॅलिवूड कलाकारांपासून ते क्रिकेटरपर्यंत कोणीही या गाण्यावर डान्स करण्यापासून स्वत: ला रोखू शकत नाहीये. हे गाणे सोशल मीडियावर देखील तूफान व्हायरल होते. इतकेच नाही तर लोकांनी या गाण्यावर अनेक प्रकारचे रील देखील तयार केले आहेत. लोकांमध्ये या गाण्याविषयी प्रचंड अशी क्रेझ आहे. आता बालिवूडचा प्रसिद्ध अभिनेत्रा अर्थात गोंविदा देखील या गाण्यावर डान्स करण्यापासून रोखू शकला नाहीये.

इथे पाहा गोविंदा आणि रश्मिकाचा डान्स व्हिडीओ

गोविंदाने केला सामी सामी गाण्यावर जबरदस्त डान्स

विशेष म्हणजे गोविंदाने साऊथची प्रसिद्ध स्टार अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत सामी सामी गाण्यावर डान्स केलाय. गोविंदा आणि रश्मिकाचा सामी सामी गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. गोविंदाने रश्मिकासोबत त्याच्या खास स्टाईलमध्ये हा डान्स केलाय. रश्मिका टीव्हीवरील डान्स रिअॅलिटी शोमध्ये तिच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आली होती.

गोविंदा आणि रश्मिकाचा डान्स व्हिडीओ व्हायरल

गोविंदा आणि रश्मिकाचा सामी सामी गाण्यावरील डान्स चाहत्यांना प्रचंड आवडलाय. गुड बाय चित्रपटामध्ये रश्मिका अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे. हा चित्रपट 7 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता बघायला मिळते आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदान्ना यांचा जबरदस्त अभिनय बघायला मिळणार आहे. रश्मिका या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्या मुलीची भूमिका साकारत आहे.