Ajay Devgn | अजय देवगणच्या विरोधात एफआयआर दाखल, वाचा नेमके प्रकरण काय?
थँक गॉड चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता बघायला मिळते आहे. हा अजय देवगणचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आहे.

मुंबई : अजय देवगणसह (Ajay Devgn) थँक गॉड चित्रपटाच्या टीमच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. भगवान चित्रगुप्ताची व्यक्तिरेखा विनोदी पद्धतीने साकारल्याबद्दल अभिनेता अजय देवगण टार्गेटवर आहे. आता अजय देवगणसह चित्रपटाच्या टीमविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलीये. थँक गॉड (Thank God) हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरच वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसते आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) इटावा येथील पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलांय.
अजय देवगणच्या अडचणींमध्ये मोठी वाढ…
थँक गॉड चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता बघायला मिळत आहे. हा अजय देवगणचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. मात्र, आता चित्रपटावरून प्रचंड वाद निर्माण झालाय. इतकेच नाही तर हे प्रकरण थेट पोलिस स्टेशनपर्यंत पोहचले आहे. आता यावर निर्माते नेमकी काय भूमिका घेतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. चित्रगुप्ताची व्यक्तिरेखा विनोदी पद्धतीने साकारल्याचा आक्षेप घेतला जातोय.
अखिल भारतीय कायस्थ महासभा चित्रपटाविरोधात आक्रमक
अखिल भारतीय कायस्थ महासभेच्या इटावा युनिटचे अध्यक्ष नरेंद्र रायजादा यांनी एफआयआर दाखल केली आहे. नरेंद्र रायजादा यांच्या तक्रारीवरून अभिनेता अजय देवगणसह अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. महासभेचे म्हणणे आहे की, भगवान चित्रगुप्त हे संपूर्ण हिंदू समाजात पूजनीय आहेत, कायस्थ समाजात पूजनीय आहेत, परंतू या चित्रपटात अजय देवगणने भगवान चित्रगुप्ताची भूमिका चूकीच्या पध्दतीने साकारलीये. हे आम्ही कधीच सहन करणार नाहीत.
