Happy Birthday Radhika Apte: परदेशी व्यक्तीशी गुपचूप लग्न , ‘या’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण, वाचा अभिनेत्री राधिका आपटेबद्दल…

| Updated on: Sep 07, 2021 | 8:58 AM

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप सोडण्यात यशस्वी झाली आहे. बॉलिवूड चित्रपटांव्यतिरिक्त, राधिका ओटीटी प्लॅटफॉर्मवर खूप व्यस्त आहे. राधिकाचा जन्म 7 सप्टेंबर 1985 रोजी वेल्लोर, तामिळनाडूमध्ये झाला.

Happy Birthday Radhika Apte: परदेशी व्यक्तीशी गुपचूप लग्न , ‘या’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण, वाचा अभिनेत्री राधिका आपटेबद्दल...
राधिका आपटे
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप सोडण्यात यशस्वी झाली आहे. बॉलिवूड चित्रपटांव्यतिरिक्त, राधिका ओटीटी प्लॅटफॉर्मवर खूप व्यस्त आहे. राधिकाचा जन्म 7 सप्टेंबर 1985 रोजी वेल्लोर, तामिळनाडूमध्ये झाला. अर्थशास्त्र आणि गणित विषयात पदवीधर असलेल्या राधिका आपटेला लहानपणापासूनच अभिनेत्री बनण्याची इच्छा होती. चला तर, तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया तिच्याशी संबंधित काही खास गोष्टी…

अभिनेत्री राधिका आपटे हिने भारतीय शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. तिने आठ वर्षे रोहिणी भाटे यांच्याकडून कथकचे प्रशिक्षण घेतले. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून तिने आपले शिक्षण पूर्ण केले. पुण्यात राहत असताना ती रंगभूमीशी जोडली गेली होती. त्यानंतर तिने मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला राधिका मुंबईत पेईंग गेस्ट म्हणून राहायची.

‘या’ चित्रपटाद्वारे पदार्पण

राधिकाने 2005 मध्ये ‘वाह लाइफ हो तो ऐसी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मुख्य अभिनेत्री म्हणून तिचा पहिला चित्रपट ‘शोर इन द सिटी’ हा होता. यानंतर तिने ‘रक्त चरित्र’, ‘रक्त चरित्र 2’ आणि ‘आय एम’ हे चित्रपट केले. काही काळ चित्रपटांमधून ब्रेक घेत राधिका लंडनमध्ये राहून नृत्य शिकली. राधिकाचा असा विश्वास आहे की, लंडनमध्ये राहण्याने तिचे आयुष्य पूर्णपणे बदलले. तिची विचार करण्याची पद्धतही बदलली. लंडनमध्येच राधिकाची भेट संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी झाली आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. 2012मध्ये त्यांनी गुपचूप लग्न केले. मात्र, 2013 मध्ये त्यांनी आपल्या लग्नाचा खुलासा केला.

एका वर्षात सहा चित्रपट रिलीज

2015 मध्ये राधिकाचे सहा चित्रपट प्रदर्शित झाले. यामुळे त्याला बरीच प्रसिद्धी मिळाली. 2015 मध्ये तिचा पहिला चित्रपट रिलीज झाला तो म्हणजे श्रीराम राघवनचा ‘बदलापूर’. छोटी भूमिका असूनही तिने प्रभाव निर्माण केला. हिंदी व्यतिरिक्त राधिकाने तमिळ, तेलगू, मल्याळम, बंगाली, मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये चित्रपट केले आहेत.

‘मांझी – द माउंटनमन’, ‘हंटर’, ‘अंधाधुन’, ‘लस्ट स्टोरी’, ‘पॅड मॅन’, ‘फोबिया’, ‘बदलापूर’ आणि ‘पार्चेड’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये ती दिसली होती. राधिका आपटेला तिच्या अनेक चित्रपटांसाठी पुरस्कारही मिळाले आहेत. ‘पार्चेड’ चित्रपटासाठी तिला लॉस एंजेलिसच्या भारतीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.

कास्टिंग काऊचचा खुलासा

राधिका आपटे आजच्या युगातील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्या अनेक विषयांवर मोकळेपणाने बोलतात. राधिकाने देखील मनोरंजन विश्वातील कास्टिंग काऊचबद्दल खुलासा केला होता. एका चित्रपटातील भूमिकेसाठी तिला लैंगिक अनुकूलता विचारण्यात आली होती. एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, जेव्हा ती एका चित्रपटाच्या सेटवर पोहोचली, तेव्हा दक्षिणच्या एका प्रसिद्ध अभिनेत्याने तिच्या पायाला स्पर्श करण्यास सुरुवात केली, त्यानंतर तिने थेट त्याच्या श्रीमुखात भडकावली होती.

हेही वाचा :

लिएंडर पेससोबतच्या नात्यावर शिक्कामोर्तब, अभिनेत्री किम शर्माने शेअर केला रोमँटिक फोटो

‘अशी रोखा नजर…त्यात भरलं जहर….’, पाहा ‘शेवंता’च्या अदांनी चाहते झाले घायाळ!