AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hera Pheri 3 | ‘हेरा फेरी 3’च्या अडचणीमध्ये मोठी वाढ, निर्मात्यांना कायदेशीर नोटीस, वाचा संपूर्ण प्रकरण

हेरा फेरी 3 हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. अगोदर हेरा फेरी 3 चित्रपटाला अक्षय कुमार याने नकार दिला. त्यानंतर सर्वांना धक्का देत अक्षय कुमार याने चित्रपटाला होकार दिला. आता चित्रपट निर्मात्यांच्या समस्येमध्ये मोठी वाढ झाली आहे. कायदेशीर नोटीस चित्रपटाला पाठवण्यात आलीये.

Hera Pheri 3 | 'हेरा फेरी 3'च्या अडचणीमध्ये मोठी वाढ, निर्मात्यांना कायदेशीर नोटीस, वाचा संपूर्ण प्रकरण
| Updated on: Apr 24, 2023 | 2:30 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी हेरा फेरी 3 (Hera Pheri 3) या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. सुरूवातीला अक्षय कुमार याने या चित्रपटाला नकार दिला. इतकेच नाही तर एका जाहिर कार्यक्रमामध्ये अक्षय कुमार याने चित्रपटाला नकार देण्याचे थेट कारणही सांगून टाकले. अक्षय कुमार (Akshay Kumar) याने थेट म्हटले की, मला हेरा फेरी 3 चित्रपटाची स्क्रीप्ट अजिबात आवडली नसल्याने मी चित्रपटाला (Movie) नकार दिला आहे. बाकी सर्व अफवा आहेत. अक्षय कुमार याचे हे बोलणे ऐकून चित्रपट निर्मात्यांनी मोठा धक्का बसला. हेरा फेरी 3 चित्रपटामध्ये अक्षय कुमार हा दिसणार नसल्याचे कळताच चाहते नाराज झाले.

काही दिवसांनी सर्वांना मोठा धक्का देत अक्षय कुमार याने अचानकपणे हेरा फेरी 3 चित्रपटाला होकार दिला. अक्षय कुमार याने हेरा फेरी 3 ला नकार दिल्यानंतर निर्माते अक्षय कुमार याच्यासोबत अभिनेता कार्तिक आर्यन याच्याही संपर्कात होते. शेवटी अक्षय कुमार याने हेरा फेरी 3 चित्रपटाला होकार दिला. फक्त अक्षय कुमार हाच नाही तर बाॅलिवूडचा मोठा स्टार देखील हेरा फेरी 3 मध्ये सहभागी झालाय.

हेरा फेरी 3 मध्ये अक्षय कुमार याच्यासोबतच संजय दत्त देखील महत्वाच्या भूमिकेत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये चित्रपटाचा प्रोमो देखील शेअर करण्यात आलाय. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता ही बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत अक्षय कुमार याचे चित्रपट बाॅक्स आॅफिस फ्लाॅप जाताना दिसत आहेत. अक्षय कुमार याच्या या चित्रपटाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.

गेल्या काही दिवसांपासून हेरा फेरी 3 चित्रपटाच्या समस्यांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. आता इरॉस इंटरनॅशनलने ट्रेड मॅगझिनमध्ये चित्रपटाविरोधात कायदेशीर नोटीस जारी करण्यात आली आहे. Eros International नी हेरा फेरी 3 चित्रपटाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये चित्रपटाचे सर्व हक्क इरॉस इंटरनॅशनलकडे असल्याचा दावा करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच हेरा फेरी 3 या चित्रपटाला टी सीरीजने देखील नोटीस बजावली आहे. यामुळे चित्रपट निर्मात्यांच्या समस्यांमध्ये सातत्याने मोठी वाढ होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, अक्षय कुमार याच्या या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि हा चित्रपटा बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला.

Follow Us
सातारा पोलीस अधीक्षकांचे निलंबन करा, उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून आदेश
सातारा पोलीस अधीक्षकांचे निलंबन करा, उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून आदेश.
मला अडवले, ओढत नेले... शंभुराज देसाई संतापले... विधान परिषदेत....
मला अडवले, ओढत नेले... शंभुराज देसाई संतापले... विधान परिषदेत.....
त्या सॉफ्ट टार्गेट, 9 माजी मंत्र्यांची चौकशी करा; संजय राऊत....
त्या सॉफ्ट टार्गेट, 9 माजी मंत्र्यांची चौकशी करा; संजय राऊत.....
खरातसोबत कुणाकुणाचे संबंध? संजय राऊतांनी थेट नावच घेतली
खरातसोबत कुणाकुणाचे संबंध? संजय राऊतांनी थेट नावच घेतली.
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.