AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shambhuraj Desai | मला अडवले, ओढत नेले... शंभुराज देसाई संतापले... विधान परिषदेत सांगितला धक्कादायक प्रकार; नेमकं काय घडलं? कधी घडलं?

Shambhuraj Desai | मला अडवले, ओढत नेले… शंभुराज देसाई संतापले… विधान परिषदेत सांगितला धक्कादायक प्रकार; नेमकं काय घडलं? कधी घडलं?

| Updated on: Mar 23, 2026 | 12:20 PM
Share

शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत पोलिसांनी केलेल्या गैरवर्तनाचा मुद्दा आज विधान परिषदेत चांगलाच गाजला. खुद्द शंभुराज देसाई यांनी त्यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तनाचा पाढाच वाचला, तसेच संबंधित पोलिस अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत पोलिसांनी केलेल्या गैरवर्तनाचा मुद्दा आज विधान परिषदेत चांगलाच गाजला. खुद्द शंभुराज देसाई यांनी त्यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तनाचा पाढाच वाचला, तसेच संबंधित पोलिस अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. मी 40 वर्षांपासून राजकारणात आहेत, पण असा वाईट अनुभव मला कधीच आला नव्हता. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती असताना मी 33 सदस्यांसह मतदानासाठी जात होतो, मात्र, एका सदस्याचे अपहरण झाल्याची खोटी तक्रार करण्यात आली. मतदान केंद्राजवळ पोहोचल्यावर साध्या कपड्यांतील 100 पेक्षा जास्त पोलिसांनी मला अडवले. मंत्री असूनही पोलिसांनी मला जबरदस्तीने ओढत नेले, असं सांगतानाच मंत्र्यांसोबत असं कुणी वागतं का? असा संतप्त सवाल शंभुराज देसाई यांनी केला. या घटनेत माझ्या हाताला दुखापत झाली. त्यामुळे राज्यात आपण सुरक्षित आहोत का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या घटनेनंतर सत्ताधारी आमदारांनीही संताप व्यक्त केला. विक्रम काळे यांनी सभागृहाचे कामकाज थांबवून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निवेदन द्यावे, अशी मागणी केली. तसेच मकरंद पाटील यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याऐवजी थेट बडतर्फ करण्याची मागणी केली. काही आमदारांनी सातारा जिल्ह्याचे पोलीस एका पक्षासारखे वागत असल्याचा आरोपही केला.

Published on: Mar 23, 2026 12:19 PM
Follow Us