Honey Singh | हनी सिंह याने अक्षय कुमार याच्याबद्दल केला मोठा खुलासा, म्हणाला, मला सतत फोन करत होता पण…

बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचे चित्रपट सतत फ्लाॅप जाताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. आता हनी सिंह याने अक्षय कुमार याच्याबद्दल मोठे भाष्य केले आहे.

Honey Singh | हनी सिंह याने अक्षय कुमार याच्याबद्दल केला मोठा खुलासा, म्हणाला, मला सतत फोन करत होता पण...
| Updated on: Apr 18, 2023 | 4:57 PM

मुंबई : रॅपर आणि गायक हनी सिंह (Honey Singh) हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. न्यू म्यूजिक अल्बम हनी 3.0 मुळे तो चर्चेत आहे. विशेष म्हणजे अल्बमचे जोरदार प्रमोशन करताना हनी सिंह हा दिसत आहे. गेल्या काही वर्षांपासून हनी सिंह हा गायब होता. यादरम्यान त्याचे एकही गाणे प्रेक्षकांच्या (Audience) भेटीला आले नाही. हनी सिंह याचे चाहते सतत त्याच्या पुनरागमनाची वाट पाहत होते. शेवटी हनी सिंह याने काही दिवसांपूर्वी दणदणीत असे पुनरागमन नक्कीच केले आहे. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीमध्ये (Interview) हनी सिंह याने लुंगी डान्स या गाण्याबद्दल मोठा खुलासा केला होता. ज्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला.

हनी सिंह याने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये हनी सिंह याने अक्षय कुमार याच्याबद्दल भाष्य केले आहे. काही दिवसांपूर्वीच हनी सिंह याने खुलासा केला की, आपण सात वर्ष डिप्रेशनमध्ये होतो आणि यादरम्यान काहीच कळत नव्हते. इतकेच नाही तर टीव्ही बघताना देखील भिती वाटत असल्याचे म्हणताना हनी सिंह दिसला होता.

हनी सिंह म्हणाला की, मी ज्यावेळी डिप्रेशनमध्ये होतो, त्यावेळी मला फोनवर कोणालाही बोलू वाटत नव्हते. मी फोनच वापरणे सात वर्ष बंद केले. मात्र, ज्यावेळी अक्षय कुमार याला माझ्या तब्येतीबद्दल समजले आणि त्याने मला थेट काॅल केला. अक्षय कुमार याचे सतत मला फोन येत होते. मात्र, तो काळच इतका जास्त वाईट होता की, मला नव्हते कोणालाच फोनवर बोलायचे.

माझी आई म्हणाली की, अक्षय पाजीचा फोन आहे, तू एकदा बोलून घे ते नाही ऐकणार. शेवटी मी अक्षय कुमार याला फोनवर बोललो. यादरम्यान काळजी घेण्याचा आणि साऊथमध्ये उपचार घेण्याचा सल्ला मला अक्षय कुमारने दिला होता. यासोबतच माझ्या या वाईट काळामध्ये अनेक स्टार माझ्यासोबत होते. मी जरी फोन वापरत नव्हतो, तरीही ते माझ्या संपर्कात कायम राहत होते.

हनी सिंह याने काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले होते, सुरूवातीचे काही वर्ष आपल्याला मानसिक आजार आहे हेच कळायला गेले. त्यानंतर कितीतरी वर्ष योग्य डाॅक्टर मिळत नव्हते. यावेळी हनी सिंह याने सांगितले की, मी तब्बल 7 वर्ष डिप्रेशनमध्ये होतो. मला काय होत आहे हे मलाच माहिती नव्हते. यादरम्यान मी सात डाॅक्टर चेंज केले पण फरक काहीच नव्हता. 2021 मध्ये मला चांगले डाॅक्टर मिळाले आणि माझ्यामध्ये सुधारणा झाली.