Video : जबरदस्तीने सेल्फी घेणाऱ्या मुलावर भडकला हृतिक रोशन, पाहा नेमका काय म्हणाला…

अभिनेता हृतिक रोशन नेहमीच चर्चेत असतो. हृतिक कधी त्याच्या प्रोफेशनल लाइफमुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहतो. दरम्यान, हृतिक रोशनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हृतिक रोशन चांगलाच भडकलेला दिसतोयं.

Video : जबरदस्तीने सेल्फी घेणाऱ्या मुलावर भडकला हृतिक रोशन, पाहा नेमका काय म्हणाला...
| Updated on: Sep 10, 2022 | 12:56 PM

मुंबई : बॉलिवूडचे (Bollywood) स्टार दिसल्यानंतर चाहते त्यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी मरमर करताना नेहमीच दिसतात. मात्र, बऱ्याच वेळा हे कलाकरांना अजिबातच आवडत नाही. मग काय फोटो काढायला आलेल्या चाहत्यांचा समाचार स्वत: स्टारच घेतात. अशाच प्रकारचा एक व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलायं. झाले असे की, बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन (Hrithik Roshan) आपल्या दोन मुलांनासोबत ब्रह्मास्त्र चित्रपट बघण्यासाठी मुंबईतील थिएटरमध्ये आला होता. त्याचवेळी चित्रपट पाहून वापस जात असताना एक घटना घडलीयं, त्याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोयं.

इथे पाहा हृतिक रोशनचा व्हायरल व्हिडीओ

ब्रह्मास्त्र चित्रपट पाहून बाहेर आल्यावर हृतिक रोशन भडकला

अभिनेता हृतिक रोशन नेहमीच चर्चेत असतो. हृतिक कधी त्याच्या प्रोफेशनल लाइफमुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहतो. दरम्यान, हृतिक रोशनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हृतिक रोशन चांगलाच भडकलेला दिसतोयं. इतकेच नाही तर हृतिक रोशनचा बाॅडीगार्ड देखील रागात दिसतोयं. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, हृतिक रोशन ऋहान आणि ऋदानसोबत दिसत आहे.

हृतिक रोशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल

हृतिक रोशन ब्रह्मास्त्र चित्रपट पाहून बाहेर येत असताना त्याच्या काही फॅनने तिथे मोठी गर्दी केली. त्या गर्दीतून मार्ग काढत हृतिक गाडीजवळ येतो. याचवेळी एक चाहता जबरदस्तीने हृतिकच्या जवळ येऊन सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र, हा प्रकार हृतिकला अजिबातच आवडत नाही आणि तो त्या चाहत्यावर चिडतो…त्याचवेळी हृतिकचे बाॅडीगार्ड त्या तरूणाला मागे खेचतात. हृतिक गाडीमध्ये बसतानाही त्या फॅनला ओरडताना दिसतोयं. आता हा हृतिकचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोयं.