Ind vs Pak: ‘आता लग्नच कॅन्सल’; के. एल. राहुल-अथिया शेट्टीवरून भन्नाट मीम्स व्हायरल

अथिया आणि के. एल. राहुल हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात तो बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा अक्षरश: वर्षाव होऊ लागला.

Ind vs Pak: आता लग्नच कॅन्सल; के. एल. राहुल-अथिया शेट्टीवरून भन्नाट मीम्स व्हायरल
के. एल. राहुल बाद झाल्यानंतर अथिया ट्रोल
Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Aug 29, 2022 | 11:40 AM

आशिया कप स्पर्धेत रविवारी पार पडलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान (Ind vs Pak) सामनादरम्यान फलंदाज के. एल. राहुलची कामगिरी सर्वांसाठीच निराशाजनक ठरली. एकही धावा न करता दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. त्यानंतर सोशल मीडियावर के. एल. राहुलची (KL Rahul) गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अथिया शेट्टीला (Athiya Shetty) जोरदार ट्रोल केलं जाऊ लागलं. अथिया आणि के. एल. राहुल हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात तो बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा अक्षरश: वर्षाव होऊ लागला. एकीकडे अथिया आणि त्याच्या लग्नाच्या चर्चा असताना अशा पद्धतीने बाद झाल्यानंतर सुनील शेट्टीसुद्धा मुलीच्या लग्नाला नकार देतील, असे कमेंट्स नेटकरी करू लागले.

के एल राहुलच्या खेळीनंतर सुनील शेट्टी, अथिया शेट्टी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रतिक्रिया कशा असतील, हे दाखवणारा हास्यास्पद मीमसुद्धा चाहत्यांनी शेअर केला. इतकंच नव्हे तर अथियाच्या अभिनयातील करिअरसारखा के. एल. राहुलचा क्रिकेट करिअर होऊ लागला आहे, असंही एका युजरने म्हटलं.

पहा मीम्स-

लग्नाबद्दल काय म्हणाले सुनील शेट्टी?

एका पत्रकाराने सुनील शेट्टी यांना मुलीच्या लग्नाबद्दल विचारल तेव्हा ते म्हणाले, “मला वाटतं जेव्हा मुलं निश्चित करतील, तेव्हा लग्न होईल. राहुलचं वेळापत्रक खूप व्यग्र आहे. आता आशिय कप आहे, वर्ल्ड कप आहे, साऊथ आफ्रिका टूर आहे, ऑस्ट्रेलिया टूर आहे. जेव्हा मुलांना ब्रेक मिळेल तेव्हा ते लग्न करतील. एका दिवसात तर लग्न होऊ शकत नाही ना? मी वडील आहे म्हणून मला वाटतं की मुलीचं लग्न वेळेत व्हावं, मात्र जेव्हा राहुलला वेळ मिळेल तेव्हा ते दोघं मिळून त्याबाबत निर्णय घेतील. तुम्ही कॅलेंडर पाहिलात तर घाबरूनच जाल. फक्त एक-दोन दिवसांचा ब्रेक त्याला मिळतोय आणि दोन दिवसांत लग्न होऊ शकत नाही. त्यामुळे जेव्हा त्याला वेळ मिळेल तेव्हा प्लॅनिंग नक्की सुरू होईल.”