Janhvi Kapoor | जान्हवी कपूर हिचा लूक पाहून चाहते हैराण, थेट म्हटले ही तर उर्फी जावेदची कार्बन कॉपी, नेटकऱ्यांचा संताप

बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. साऊथ चित्रपटामध्ये काम करण्याची सुवर्णसंधी ही जान्हवी कपूर हिला मिळालीये. विशेष म्हणजे ज्युनिअर एनटीआर याच्यासोबत स्क्रीन शेअर करताना बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूर ही दिसणार आहे.

Janhvi Kapoor | जान्हवी कपूर हिचा लूक पाहून चाहते हैराण, थेट म्हटले ही तर उर्फी जावेदची कार्बन कॉपी, नेटकऱ्यांचा संताप
| Updated on: Apr 27, 2023 | 3:04 PM

मुंबई : बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूर ही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हिचा मिली हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला बाॅक्स आॅफिसवर काही खास धमाल करण्यात यश मिळाले नाही. जान्हवी कपूर हिचा मिली हा चित्रपट फ्लाॅप गेला. विशेष म्हणजे जान्हवी कपूर हिच्या मिली चित्रपटाची (Movie) निर्मिती तिचेच वडील बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी केली. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना जान्हवी कपूर ही दिसली होती. या चित्रपटाकडून सर्वांनाच प्रचंड अपेक्षा होत्या. चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर चाहत्यांमध्येही मोठी क्रेझ ही बघायला मिळत होती. प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी याकडे पाठ फिरवलीये.

जान्हवी कपूर ही सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. जान्हवी कपूर आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच दिसते. नुकताच जान्हवी कपूर हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसलाय. या व्हिडीओमुळे जान्हवी कपूर हिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.

जान्हवी कपूर हिचा जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवी कपूर ही थाई हाई स्लिट बॅकलेस हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. जान्हवी कपूर हिचा हा ड्रेस पाहून अनेकांना मोठा धक्का बसलाय. या ड्रेसमध्ये जान्हवी कपूर ही अत्यंत बोल्ड दिसत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर जान्हवी कपूर हिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.

या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, ही तर उर्फी जावेदच आहे. दुसऱ्याने लिहिले की, हिने खूप चांगल्या गोष्टी या उर्फी जावेद हिच्याकडून शिकल्या आहेत. तिसऱ्याने लिहिले की, ही उर्फी जावेद हिच्यापेक्षाही पुढची आहे, उर्फी तर फक्त आणि फक्त बदनामच आहे. अजून एकाने लिहिले की, सर्वांनाच उर्फी जावेद हिच्यासारखे बनायचे आहे. या व्हिडीओमुळे जान्हवी कपूर ही प्रचंड ट्रोल होताना दिसत आहे.

जान्हवी कपूर आता लवकरच साऊथ डेब्यू करणार आहे. विशेष म्हणजे थेट ज्यूनियर एनटीआर याच्यासोबत काम करण्याची संधी ही जान्हवी कपूर हिला मिळालीये. एनटीआर 30 चित्रपटात जान्हवी महत्वाच्या भूमिकेत आहे. काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूर हिने साऊथच्या चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा जाहिर केली होती. विशेष म्हणजे थेट तिला ज्यूनियर एनटीआर काम करताना येणार आहे. एनटीआर 30 हा चित्रपट अत्यंत बिग बजेटचा चित्रपट आहे.