Jaya Bachchan | जया बच्चनचा ‘तो’ व्हिडीओ पाहून उर्फी जावेदचा पारा चढला

जया बच्चनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतोय. या व्हिडीओवर आता उर्फी जावेदने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

Jaya Bachchan | जया बच्चनचा तो व्हिडीओ पाहून उर्फी जावेदचा पारा चढला
'अशा लोकांना नोकरीवरुन काढा', कोणावर भडकल्या जया बच्चन?
| Updated on: Oct 19, 2022 | 10:45 AM

मुंबई : जया बच्चन यांचा एक व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये जया बच्चन यांची नात नव्या नवेली देखील दिसत आहे. पापाराझी जया बच्चन यांचे फोटो क्लिक करत असताना जया बच्चन असे काही बोलल्या की, सोशल मीडियावर (Social media) नेटकरी हे जया बच्चन यांच्यावर टीका करत असून अनेक कलाकारांनी देखील यावर स्पष्ट भूमिका घेतलीये. जया बच्चन (Jaya Bachchan) त्यांच्या बिनधास्त शैलीमुळे ओळखल्या जातात. त्यांना जर एखाद्याचा राग आला की, त्या थेट बोलून मोकळ्या होतात.

इथे पाहा जया बच्चन यांचा व्हायरल होणारा व्हिडीओ

जया बच्चन या विमानतळावर जात असताना पापाराझी जया बच्चन आणि नात नव्या नवेलीचे काही फोटो क्लिक करत होते. मात्र, यादरम्यान फोटो क्लिक करण्याच्या नादामध्ये एक पापाराझी पडता पडता थोडक्यात वाचला. यावर त्याला काही लागले का? हे विचारण्याऐवजी जे घडले ते चांगलेच घडले असल्याचे जया बच्चन म्हणाल्या. इतकेच नाही तर जया बच्चन पुढे म्हणाल्या की, अजून दोनदा पडायला हवे तू…जया बच्चनचा हा व्हिडीओ पाहिल्यावर नेटकऱ्यांचा पारा चांगलाच चढलाय.

जया बच्चनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतोय. या व्हिडीओवर आता उर्फी जावेदने देखील प्रतिक्रिया दिली असून तिने जया बच्चन यांना चांगलेच सुनावले देखील आहे. उर्फी जावेदने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर जया बच्चनचा तो व्हिडीओ शेअर केला आणि लिहिले की, तुम्ही कधीच जया बच्चन बनू नका. जया बच्चनचा हा व्हिडीओ पाहिल्यावर प्रत्येकजणच त्यांच्यावर टीका करतोय. एखाद्या व्यक्तीला तू पुन्हा पडायला हवा, असे म्हणणे योग्य नसल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.