MukhyaMantri Ladki Bahin Yojana : नवीन वर्षाचा पहिलाच दिवस लाडक्या बहिणींसाठी ठरला सर्वात मोठा… असं होईल वाटलंही नव्हतं, सरकारने… काय आहे नेमकं?
राज्यातील लाडक्या बहीणींसाठी एक मोठी अपडेट आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून लाडक्या बहिणींचया खात्यात 1500 रुपये जमा झाले नव्हते. मात्र आता याबाबत मोठी माहिती समोर येत आहे. लाडक्या बहिणींना..

जुनं वर्ष सरून 2026 चं नववर्ष उजाडलं असून या नव वर्षात राज्यातील लाडक्या बहीणींसाठी एक मोठी अपडेट आली आहे. लाडक्या बहिणींना मिळणारे 1500 रुपये गेल्या दोन महिन्यांपासून खात्यात जमा झाले नव्हते. मात्र आता याचसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या’ (MukhyaMantri Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांना पैसे मिळण्यास सुरूवात झाली असून त्यांच्या खात्यात एका महिन्याचा हप्ता, म्हणजेच 1500 रुपये जमा झाले आहेत. ज्या लाभार्थी महिलांनी ई-केवायसीची (E-Kyc) प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहेत.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी खात्यात पैसे मिळाल्याने लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे. तुम्ही लाभार्थी असाल तर हे पैसे जमा झालेत की नाही ते ऑनसलाइनही चेक करू शकता. मात्र असे असले तरी डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे कधी मिलमार असा सवाल अनेकींच्या मनात आहे.
गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील सुमारे 2 कोटी महिला या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. राज्यसरकारने जाहीर केलेल्या या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महीना 1500 रुपये जमा होता. मात्र ऑक्टोबरमध्ये पैसे मिळाल्यानंतर नोव्हेंबर सरला, डिसेंबर संपला तरी लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नव्हते. त्यांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे तीन महिन्याचे एकत्र 4500 रुपये मिळतील अशाही बातम्या समोर येत होत्या, मात्र हे पैसे खात्यात कधी जमा होणार याची काही अधिकृत माहिती समोर आली नव्हती.
1500 रुपये जमा होण्यास सुरूवात
मात्र अखेर कालपासून (31 डिसेंबर) लाभार्थी महिलांच्या खात्यात एक महिन्याचे पैसे (1500 रुपये) जमा झाले असून अनेकींना याचा लाभ मिळाला आहे. ज्या महिलांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली त्यांच्याच खात्यात 1500 रुपये जमा झाले आहेत. मात्र हे एकाच महिन्याचे पैसे असून डिसेंबरचे आणि आज सुरू झालेल्या जानेवारी महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना कधी मिळतील हे काही स्पष्ट झालेलं नाही. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही ऑनलाइन तपासू शकता. तुमचं ज्या बँकेत अकाऊंट आहे, त्या बँकेच्या अधिकृत ॲपवर जाऊन बॅलेन्स चेक करून पैसे आलेत की नाही हे समजू शकतं.
ई-केवायसी पूर्ण केलेल्या लाडक्या बहिणींना मिळणार लाभ
दरम्यान लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलं होतं. त्याची मुदत काल ( 31 डिसेंबर)पर्यंतच होती. . खरंतर नोव्हेंबरपर्यंतच ई-केवायसीची मुदत होती, मात्र लाखो महिलांचे ई-केवायसी न झाल्याने ही मुदत वाढवण्यात आली होती. लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थी वगळण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून ईकेवायसी बंधनकारक करण्यात आले होते. आधी ईकेवायसीची मुदत 18 नोव्हेंबरपर्यंत होती, मग ती वाढवून 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. पण त्यानंतरही अनेक महिलांना ई-केवायसी करण्याच अडचणी आल्याने ही मुदत वर्षाअखेरीस, 31 डिसेंबपर्यंत वाढवण्यात आली. काल अखेर ही मुदत संपली. त्यामुळे आता ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे, त्यानंच या योजनेचा लाभ आणि पर्यायाने दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. उर्वरित महिलांना या योजनेला मुकावे लागू शकते.
