“जेव्हा एखादा व्यक्ती मला पाकिस्तानला जायला सांगतो, तेव्हा..”; ‘बजरंगी भाईजान’च्या दिग्दर्शकाने व्यक्त केली खंत

| Updated on: Mar 27, 2022 | 3:51 PM

'एक था टायगर', 'बजरंगी भाईजान', 'सुलतान', '83' यांसारख्या चित्रपटांचा दिग्दर्शक कबीर खान (Kabir Khan) नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ट्रोलिंगवर व्यक्त झाला. सिनेमातील देशभक्ती आणि राष्ट्रवाद या दोन गोष्टींमध्ये फरक असून देशावरील प्रेम दाखवताना त्याला कोणत्याही 'काऊंटर पॉईंट'ती गरज नाही, असं त्याचं म्हणणं आहे.

जेव्हा एखादा व्यक्ती मला पाकिस्तानला जायला सांगतो, तेव्हा..; बजरंगी भाईजानच्या दिग्दर्शकाने व्यक्त केली खंत
Kabir Khan
Image Credit source: Twitter
Follow us on

‘एक था टायगर’, ‘बजरंगी भाईजान’, ‘सुलतान’, ’83’ यांसारख्या चित्रपटांचा दिग्दर्शक कबीर खान (Kabir Khan) नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ट्रोलिंगवर व्यक्त झाला. सिनेमातील देशभक्ती आणि राष्ट्रवाद या दोन गोष्टींमध्ये फरक असून देशावरील प्रेम दाखवताना त्याला कोणत्याही ‘काऊंटर पॉईंट’ती गरज नाही, असं त्याचं म्हणणं आहे. कबीर खानला अनेकदा सोशल मीडियावर (Social Media) ट्रोल व्हावं लागलं. अनेकांनी त्याला पाकिस्तानला (Pakistan) जाण्यास सांगितलं. अशा नकारात्मक गोष्टी ऐकून फार वाईट वाटत असल्याची भावना त्याने व्यक्त केली. ‘एबीपी समिट’मध्ये तो याविषयी व्यक्त झाला. सोशल मीडियामुळे लोकांना कुठेही काहीही बोलण्याचं स्वातंत्र्य मिळत असल्याचंही त्याने म्हटलंय.

“आदर आणि प्रेमापोटी दहा वर्षांपूर्वी एखाद्याला काय वाटत होतं ते तुम्हाला वैयक्तिकरित्या सांगता येत नव्हतं, पण आज तुमच्या स्वतःच्याच शब्दांची जबाबदारी राहिली नाही. मला फार वाईट वाटतं. पण हेच वास्तव आहे ज्यात आपण जगत आहोत. सोशल मीडियाचा विषारी किंवा नकारात्मक प्रभाव हा सकारात्मक प्रभावापेक्षा जास्त आहे असं मला वाटतं. माझं नाव खान आहे आणि म्हणूनच मला सांगितले जातं की ‘पाकिस्तानात जा’. जेव्हा मी एकदा पाकिस्तानात गेलो, तेव्हा लष्करने (दहशतवादी संघटना) भारतात परत जाण्यास सांगितलं. त्यामुळे मी इथेही नाही आणि तिकडेही नाही. जर तुम्ही एखादी कथा दाखवत असाल तर त्यावरून अनेक भावना जागृत होतात आणि ते ठीक आहे”, असं कबीर म्हणाला.

कबीर खानची पोस्ट-

“प्रत्येक चित्रपट दिग्दर्शकाचं स्वतःचं प्रतिबिंब (तो बनवलेल्या चित्रपटांमध्ये) असलं पाहिजे. आपण कधी कधी चित्रपटात तिरंगा दाखवतो पण आज देशभक्ती आणि राष्ट्रवाद यात फरक आहे. राष्ट्रवादासाठी कधीकधी आपल्याला व्हिलन किंवा काऊंटर पॉईंटची गरज असते. पण देशभक्तीसाठी अशा कोणत्याही गोष्टीची गरज नसते. देशभक्ती म्हणजे तुमच्या देशासाठी असलेलं निव्वळ प्रेम. हेच मी 83 या चित्रपटातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे”, असंही मत त्याने यावेळी मांडलं.

हेही वाचा:

श्रेयस तळपदे ते मुक्ता बर्वे.. मराठी टीव्ही इंडस्ट्रीत सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार

‘अनुपमा’मधल्या प्रसिद्ध अभिनेत्रीने देवाचं कारण देत अभिनयक्षेत्राला केला रामराम!