Karan Johar | कुटुंबाचा जीव धोक्यात घालून तुझा चित्रपट पहायचा का? नेटकरी करण जोहरवर संतापले!

| Updated on: Dec 31, 2021 | 1:40 PM

अलीकडेच, शाहिद कपूरचा चित्रपट 'जर्सी' ची रिलीज पुढे ढकलण्यात आली होती, जो 31 डिसेंबरला रिलीज होणार होता. दरम्यान, निर्माता करण जोहरने ट्विट करून दिल्ली सरकारला कोरोना मार्गदर्शक तत्त्वांनुसार चित्रपटगृहे पुन्हा सुरू करण्याचा विचार करण्याची विनंती केली आहे.

Karan Johar | कुटुंबाचा जीव धोक्यात घालून तुझा चित्रपट पहायचा का? नेटकरी करण जोहरवर संतापले!
करण जोहर
Follow us on

मुंबई : कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकाराने जगभरात दहशत निर्माण केली आहे. दिल्ली आणि मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने 28 डिसेंबर पासून सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृहे बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. सरकारच्या या आदेशाने मनोरंजन उद्योग आणि मल्टिप्लेक्स असोसिएशनमध्ये खळबळ उडाली आहे. कारण, चित्रपटगृहे बंद पडल्याने चित्रपटगृह मालक आणि चित्रपट निर्मात्यांना मोठे नुकसान होणार आहे.

अलीकडेच, शाहिद कपूरचा चित्रपट ‘जर्सी’ ची रिलीज पुढे ढकलण्यात आली होती, जो 31 डिसेंबरला रिलीज होणार होता. दरम्यान, निर्माता करण जोहरने ट्विट करून दिल्ली सरकारला कोरोना मार्गदर्शक तत्त्वांनुसार चित्रपटगृहे पुन्हा सुरू करण्याचा विचार करण्याची विनंती केली आहे. आता या ट्विटमुळे करण जोहरला प्रचंड ट्रोल केले जात आहे.

दिल्ली सरकारला विनंती केल्यानंतर करण जोहर झाला ट्रोल!

करण जोहरने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘आम्ही दिल्ली सरकारला सिनेमा हॉल सुरु ठेवण्याची परवानगी देण्याची विनंती करतो. चित्रपटगृहांमध्ये स्वच्छता आणि सामाजिक अंतराची व्यवस्था बाहेरील व्यवस्थेपेक्षा चांगली आहे.’ करण जोहरने हे ट्विट दिल्लीचे नायब राज्यपाल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयाला टॅग केले आहे. #cinemasaresafe ट्विटच्या शेवटी लिहिले आहे. या ट्विटमुळे करण जोहर लोकांच्या निशाण्यावर आला असून, लोक त्याला खूप ट्रोल करत आहेत.

करण जोहर ट्रोल!

करण जोहरच्या ट्विटला उत्तर देताना एका यूजरने लिहिले की, ‘आग लागली तरी चालेल आपण आपल्या मस्तीत जगायचं’दुसर्‍याने टिप्पणी केली, ‘होय याचा अर्थ असा आहे की लोकांनी आपले निरुपयोगी चित्रपट पाहण्यासाठी आपला आणि त्यांच्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालावा, यामुळे त्यांना पैसे मिळतील.’ दुसऱ्याने लिहिले, ‘सिनेमा OTT वर पाहता येईल. पण जर संसर्गाचा दर वाढला आणि ऑक्सिजन संपला तर लोक मरतील.’

करण जोहर ‘या’ चित्रपटामुळे चर्चेत

करण जोहरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तो त्याच्या नवीन चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तो स्वत: करत आहेत. या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन यांसारखे दिग्गज कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. यापूर्वी, करण जोहरने 2016 मध्ये ‘ए दिल है मुश्किल’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता, जो बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.

हेही वाचा :

RRR Movie Release | ओमिक्रॉन-कोरोनाचं संकट तरीही मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार ‘RRR’, निर्मात्यांचा मोठा निर्णय!

Shilpa Shirodkar | सगळ्यात पहिली ‘लसवंत’ अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह! शिल्पा शिरोडकर विषाणूच्या विळख्यात!

अभिनेत्री पूजा सावंत, चिन्मय उदगीरकर यांना सुविचार गौरव पुरस्कार; मंत्री जयंत पाटलांच्या हस्ते नाशिकमध्ये होणार सन्मान