अमिताभ बच्चन नेहमीच ‘जया बच्चन’च्या या गोष्टीला घाबरतात, बिग बी यांनी सांगितले सिक्रेट

अमिताभ बच्चन अनेकदा कौन बनेगा करोडपतीमध्ये आपल्या खाजगी आयुष्याबद्दल देखील माहिती सांगतात.

अमिताभ बच्चन नेहमीच जया बच्चनच्या या गोष्टीला घाबरतात, बिग बी यांनी सांगितले सिक्रेट
Amitabh Bachchan
Image Credit source: Twitter
| Updated on: Nov 12, 2022 | 9:17 AM

मुंबई : कौन बनेगा करोडपतीचे 14 वे सीजन सुरू आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्याला बघण्यासाठी बिग बीचे फॅन कायमच आतुर असतात. अमिताभ बच्चन अनेकदा कौन बनेगा करोडपतीमध्ये आपल्या खाजगी आयुष्याबद्दल देखील माहिती सांगतात. यावेळीच्या एपिसोडमध्येही आपल्या खासगी आयुष्यातील एक गुपित अमिताभ बच्चन यांनी जाहिर केलंय. नुकताच अमिताभ बच्चन यांचा ऊंचाई हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटात अमिताभ बच्चनसोबतच अनुपम खेर देखील मुख्य भूमिकेत आहेत.

कौन बनेगा करोडपतीच्या एका नव्या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आणि जया बच्चनच्या रिलेशनबद्दल मोठी माहिती चाहत्यांसोबत शेअर केलीये. अमिताभ बच्चन म्हणाले की, मी कधीच जया बच्चनचा फोन मिस करत नाही…जर कधी चुकून असे झाले आणि मी जया यांचा फोन नाही उचलू शकलो तर माझ्यासाठी खूप समस्या निर्माण होतात, असे अमिताभ बच्चन म्हणाले आहेत.

इतकेच नाही तर फोन न उचलल्यामुळे चक्क अमिताभ बच्चन यांना जया बच्चन यांच्या रागाला सामोरे जावे लागते, असेही अमिताभ बच्चन म्हणाले. यावेळी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या काही काॅलेजच्या आठवणी देखील सांगितल्या. ऊंचाई चित्रपटाच्या रिलीजच्या दिवशी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेले होते.