आधी बनले बहीण-भाऊ, मग केलं लग्न, ‘रामायणा’तील सुपरस्टारचा जुना व्हिडीओ व्हायरल

KGF स्टार यश आणि राधिका पंडित यांची अनोखी लव्ह स्टोरी चर्चेत आहे. 'नंदा गोकुला' या कन्नड टीव्ही मालिकेत त्यांनी बहीण-भावाची भूमिका केली होती. हा जुना व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. पडद्यावरचे बहीण-भाऊ नंतर आयुष्याचे जोडीदार कसे झाले, या प्रवासाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.

आधी बनले बहीण-भाऊ, मग केलं लग्न, रामायणातील सुपरस्टारचा जुना व्हिडीओ व्हायरल
Yash Radhika Pandit
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 26, 2026 | 11:39 PM

‘केजीएफ’ फ्रेंचाइजी आणि आता ‘रामायण‘च्या यशानंतर प्रसिद्ध अभिनेता यशचं स्टारडम आता केवळ साऊथ पुरतं मर्यादित राहिलेलं नाही. संपूर्ण देशात त्याच्या फॅनची संख्या वाढली आहे. एका सिनेमामुळे यश हा रातोरात सुपरस्टार झाला आहे. त्याची क्रेझ इतकी वाढलीय की त्याचे प्रत्येक प्रोजेक्ट, त्याचं प्रत्येक विधान, पर्सनल लाइफशी संबंधित व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच चर्चेचेमध्ये त्याची आणि त्याची पत्नी राधिका पंडितच्या लव्ह स्टोरीचा किस्साही चर्चेत आला आहे. एखाद्या सिनेमाच्या स्क्रिप्टसारखाच हा किस्सा आहे.

रामायण सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई सुरू केलेली असतानाच यश आणि राधिकाची कन्नड टीव्ही सीरिअल नंदा गोकुलाचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या सीरिअलमध्ये दोघांनी बहीण भावाची भूमिका साकारली होती. राधिका पंडितचं नंदा गोकुलाच्या माध्यमातून टीव्हीच्या दुनियेतील पहिलं पाऊल होतं. तर यशने त्यापूर्वी उत्तरायण नावाची सीरिअल केली होती. या सीरिअलमध्ये दोघे बहीण भाऊ दाखवले होते. या सीरिअलमध्ये भेट झाली. पुढे दोन तीन सिनेमे एकत्र करताना दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Loading...

अन् सुपरस्टार झाला

2007मध्ये नंदा गोकुला सीरिअलच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली. त्यानंतर दोघांनी ‘मोग्गिना मनसु’ तसेच ‘मिस्टर अँड मिसेज रामाचारी’ सारख्या हिट सिनेमात काम केलं. यशचं खरं नाव नवीन कुमार गौडा आहे. बालपणी त्यांना सर्वजण यशवंत म्हणायचे. त्यामुळे यशवंतचं त्यांनी यश असं शॉर्ट फॉर्म केलं. मिळालेल्या माहितीनुसार, नंदा गोकुलाचे 50 एपिसोड पूर्ण झाल्यावर यशने दिग्दर्शक अशोक कश्यप यांना टायटल कार्डमधून नाव बदलण्याची विनंती केली होती. त्याने मला टायटल कार्डवरील नाव बदलून यश करायला सांगितलं. त्याला मी त्याचं कारण विचारल्यावर त्याला ठोस असं उत्तर देता आलं नाही. त्याला वाटलं त्याच्या करिअरसाठी ते योग्य होईल, असं अशोक कश्यप यांनी सांगितलं. या मालिकेमुळेच यशला चांगलं यश मिळालं आणि तो कर्नाटकातील सुपरस्टार झाला होता.

 

क्लिपवर रिअॅक्शन

सोशल मीडियावर यशचे जुने व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यावर मजेदार कमेंट येत आहेत. त्यावेळी तो खूपच सुंदर होता, असं एकाने म्हटलंय. दुसऱ्याने तर, त्या सीरिअलमध्ये दोघे बहीण भाऊ होते. आता नवरा बायको आहेत, अशी कमेंट केली. त्यावर तिसरा म्हणतो, ते काही असू द्या. पण हे जोडपं लय ग्वॉड आहे.

दिवाळी दणक्यात

रामायणाच्या यशानंतर यशने आपल्या कुटुंबासोबत दिवाळी धडाक्यात साजरी केली. त्याने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा देताना कुटुंबासोबतचा फोटो पोस्ट केला. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. प्रेमासाठी धन्यवाद, अशी पोस्ट त्याने या फोटोसोबत केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us