Khoya Khoya Chand | अवघ्या 8 वर्षांच्या कारकिर्दीनंतर ट्विंकल खन्नाने घेतला मनोरंजन विश्वाचा निरोप, कारण सांगताना म्हणाली…

| Updated on: Aug 01, 2021 | 9:19 AM

अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) हे बॉलिवूडचे एक मोठे नाव आहे. अभिनेत्री बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता राजेश खन्ना यांची मुलगी आहे.

Khoya Khoya Chand | अवघ्या 8 वर्षांच्या कारकिर्दीनंतर ट्विंकल खन्नाने घेतला मनोरंजन विश्वाचा निरोप, कारण सांगताना म्हणाली...
ट्विंकल खन्ना
Follow us on

मुंबई : अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) हे बॉलिवूडचे एक मोठे नाव आहे. अभिनेत्री बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता राजेश खन्ना यांची मुलगी आहे. पण या इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकाची कारकीर्द आपल्या पालकांसारखीच झाली असे नाही, हेच ट्विंकल खन्नाच्या बाबतीत देखील घडले. काही मोठ्या चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर ट्विंकल सिनेमामधून पूर्णपणे गायब झाली. ट्विंकल खन्नाने तिच्या ‘बरसात’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अभिनेत्रीचा हा चित्रपट 1995मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात, बॉबी देओल त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसला.

ट्विंकलच्या ‘बरसात’ चित्रपटाने बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर भरपूर गल्ला जमवला. ज्यामुळे तिचा पहिला चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटानंतरही अभिनेत्रीने अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले. ज्यात, ‘जान’ (1996), ‘दिल तेरा दीवाना’ (1996), ‘उफ ये मोहब्बत’ (1997), ‘जब प्यार किसीसे होता है’ (1998) या चित्रपटांचा समावेश होता.

अभिनेत्रीच्या अभिनयाची जादू ‘बादशाह’ आणि ‘इंटरनॅशनल खिलाडी’ सारख्या चित्रपटांसह अनेक चित्रपटांमध्येही दिसली. पण, असे म्हटले गेले की ट्विंकलचे हे हे चित्रपटही तिच्या सहकलाकारांमुळे अधिक गाजले. ट्विंकल खन्ना शेवट ‘लव के लिए कुछ भी करेगा’ या चित्रपटात दिसली होती. तिचा हा चित्रपट 2001मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तिने आपल्या फिल्मी कारकिर्दीला निरोप दिला. 17 जानेवारी 2001 रोजी ट्विंकल आणि अक्षय कुमार यांचे लग्न झाले. त्यानंतर ती कोणत्याही चित्रपटात दिसली नाही.

ट्विंकलने स्वतः सांगितले बॉलिवूड सोडण्याचे कारण…

एका माध्यमवृत्तानुसार, ट्विंकल म्हणते की, ती सुरुवातीपासूनच अभ्यासात खूप हुशार होती, ज्यामुळे तिला नेहमीच चार्टर्ड अकाउंटंट होण्याची इच्छा होती. पण तिचे आई-वडील दोघेही बॉलिवूडचे मोठे स्टार्स होते, त्यामुळे अभिनयाव्यतिरिक्त इतर करिअर निवडणे तिच्यासाठी खूप कठीण होते. अभिनेत्रीने तिच्या एका खास मुलाखतीत सांगितले होते की, तिची आई डिंपल कपाडिया तिला म्हणाली की, ‘जर तुला चार्टर्ड अकाउंटंट बनायचे असेल, तर अभिनेत्री झाल्यानंतरही हे करता येईल. परंतु, जर तू आता चार्टर्ड अकाउंटंटचा अभ्यास सुरू केलास तर, अभिनेत्री होणे खूप कठीण जाईल.

अभिनेत्री पुढे म्हणाली की, चित्रपटांमध्ये सतत 8 वर्षे काम केल्यानंतर, तिला वाटले की ती एक अभिनेत्री म्हणून पूर्णपणे अपयशी ठरली आहे. पण याचा अर्थ असा नाही की, ती इतर कोणत्याही क्षेत्रात काम करू शकत नाही.

चित्रपट निर्माती बनली ट्विंकल खन्ना

जेव्हा, चित्रपटांमधील कारकीर्द उतरणीला लागली, तेव्हा ट्विंकल खन्नाने चित्रपटांची निर्मिती करण्यास सुरुवात केली. ती मुख्यतः त्याच चित्रपटांची निर्मिती करते, ज्यात तिचा पती अक्षय कुमार काम करतो. ज्यामध्ये ‘पटियाला हाऊस’ (2011), ‘पॅड मॅन’ (2018), ‘तीस मार खान’ (2010), ‘थँक यू’ (2011) असे अनेक चित्रपट समाविष्ट आहेत. ट्विंकल एक गृहिणी तसेच एक उत्तम लेखिका आहे. आतापर्यंत तिची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

(Khoya Khoya Chand know the reason why Twinkle Khanna quit Bollywood)

हेही वाचा :

‘तू लय बदललीस गं गंगे…’, अभिनेत्री राजश्री लांडगेसाठी चित्रा वाघ यांची खास पोस्ट

‘गं कुणी तरी येणार येणार गं’, ‘मम्मी’ फेम अभिनेत्री स्मिता तांबेकडे ‘गोड बातमी’!