Video | ‘गं कुणी तरी येणार येणार गं’, ‘मम्मी’ फेम अभिनेत्री स्मिता तांबेकडे ‘गोड बातमी’!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: Harshada Bhirvandekar

Updated on: Jul 31, 2021 | 4:05 PM

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘लाडाची लेक गं’मधील ‘मम्मी’ फेम अभिनेत्री स्मिता तांबे (Amita Tambe)हिने प्रेक्षकांना आणि चाहत्यांना गोड बातमी दिली आहे.

Video | ‘गं कुणी तरी येणार येणार गं’, ‘मम्मी’ फेम अभिनेत्री स्मिता तांबेकडे ‘गोड बातमी’!
स्मिता तांबे

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘लाडाची लेक गं’मधील ‘मम्मी’ फेम अभिनेत्री स्मिता तांबे (Amita Tambe) हिने प्रेक्षकांना आणि चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. अभिनेत्री स्मिता तांबेच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. स्मिताची मैत्रीण-कोरिओग्राफर फुलवा खामकर हिने एक खास व्हिडीओ शेअर करत ही गोड बातमी सगळ्या चाहत्यांना सांगितली आहे.

फुलवा खामकरने शेअर केलेल्या या खास व्हिडीओत अभिनेत्री स्मिता तांबे हीचं डोहाळेजेवणाचा कार्क्रम दिसत आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय सध्या आणि सोप्या पद्धतीने हा डोहाळजेवणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात स्मिताच्या खास जवळच्या मैत्रिणी अर्थात अभिनेत्री अदिती सारंगधर, अमृता संत आणि रेषां टिपणीस सहभागी झाल्या होत्या.

पाहा खास व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by PHULAWA (@phulawa)

या खास प्रसंगी मैत्रिणींनी मिळून स्मिताला फुलांच्या दागिन्यांनी सजवलं आहे. गाणी म्हणत या मैत्रिणींनी स्मिता भोवती फेर धरला होता. ‘कुणीतरी येणार येणार गं’ या गाण्यावर सगळ्या जणींनी ठेका धरला होता. शिवाय स्मिताचे पति धिरेंद्र यांनीही या सोहळ्यात डान्स केला. स्मिताच्या डोहाळे जेवणाचा हा गोड व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

अभिनेत्रीची कारकीर्द

अभिनेत्री स्मिता तांबेचा जन्म महाराष्ट्रात साताऱ्यामध्ये झाले. तर तिचं बालपण पुण्यात गेलं. मनोरंजन विश्वात करिअर करण्यासाठी म्हणून स्मिता मुंबईत आली. मराठी सोबतच स्मिताने हिंदी मनोरंजन विश्वातही आपल्या अभिनायचा ठसा उमटवला आहे. ‘अनुबंध’, ‘लाडाची लेक गं’ या मालिका, ‘तुकाराम’, ‘जोगवा’, ‘७२ मैल एक प्रवास’, ‘परतु’, ‘गणवेश’ हे चित्रपट आणि ‘हमिदाबाईची कोठी’ या नाटकातून तिने आपल्या अभिनयची चुणूक दाखवली. याच बरोबर ती ‘सिंघम रिर्टन्स’, ‘रुख’, ‘नूर’, ‘डबल गेम’ या हिंदी चित्रपटांमध्येही ती झळकली होती.

स्मिता तांबेने अभिनेता विरेंद्र द्विवेदीसोबत 18 जानेवारी 2019 रोजी लग्न लग्नगाठ बांधली होती. विरेंद्र द्विवेदी हा नाट्य कलाकार असून, त्यांचे लग्न महाराष्ट्रीयन आणि उत्तर भारतीय अशा दोन्ही पारंपरिक पद्धतीने पार पडले होते.

(Actress Smita Tambe good news expecting her first child)

हेही वाचा :

श्रद्धा कपूरची पर्सनल चॅट सोशल मीडियावर लीक, चाहत्यांनी पापाराझींना फटकारले!

आपल्या जीवाची बाजी लावत मुमताजने वाचवला होता ‘या’ बॉलिवूड सुपरस्टारचा जीव!

PHOTO | ‘हे आनंदाचे क्षण आयुष्यभर टिकून राहतील जर…’, सोशल मीडियावर दिसला राजेश्वरीचा चिलिंग मूड!

उमेश कामत आणि मुक्ता बर्वेची ‘61 मिनिट्स’ रसिकांच्या भेटीला! घरबसल्या घेता येणार थरारनाट्याच्या अनुभव!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI