Shraddha Kapoor | श्रद्धा कपूरची पर्सनल चॅट सोशल मीडियावर लीक, चाहत्यांनी पापाराझींना फटकारले!

अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) अलीकडेच मुंबईत तिच्या आगामी चित्रपटाच्या सेटच्या बाहेर दिसली होती. ज्यावेळचे काही फोटो पापाराझींनी सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.

Shraddha Kapoor | श्रद्धा कपूरची पर्सनल चॅट सोशल मीडियावर लीक, चाहत्यांनी पापाराझींना फटकारले!
श्रद्धा कपूर

मुंबई : अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) अलीकडेच मुंबईत तिच्या आगामी चित्रपटाच्या सेटच्या बाहेर दिसली होती. ज्यावेळचे काही फोटो पापाराझींनी सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. या फोटोंमध्ये श्रद्धाने निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे आणि हातात मोबाईल घेऊन चॅट करण्यात व्यस्त आहे. श्रद्धाच्या फोटोंबरोबरच पापाराझींनी तिच्या वैयक्तिक व्हॉट्सअॅप चॅटचे फोटोही व्हायरल केले आहेत. आता ही पर्सनल चॅट लीक केल्याबद्दल श्रद्धा कपूरचे चाहते पापाराझींना जोरदार ट्रोल करत आहेत.

वास्तविक, श्रद्धा कपूरच्या पर्सनल चॅटच्या व्हायरल झालेल्या फोटोंवरून असे दिसून येते की, ती तिच्या एका खास व्यक्तीशी गप्पा मारत होती. त्यांच्या गप्पांमधूनच हे उघड झाले आहे. कारण, ज्या व्यक्तीशी श्रद्धा बोलत होती त्याचा नंबर नावाऐवजी तीन हार्ट इमोजींद्वारे सेव्ह केला आहे. श्रद्धाच्या या फोटोंमधून लीक झालेल्या गप्पांमध्ये अभिनेत्री मेसेजमध्ये लिहिले की, “मी आयुष्यात तुमच्यासारख्या व्यक्तीला कधीच भेटले नाही.” यावर तिला उत्तर येते की, “मला असे वाटते की, तुम्हीच असा विचार करता.”

श्रद्धा पुढे लिहिते, “तू माझं खरं ऐकतोस, कोणीही असं नव्हतं. तू मला नेहमीच छान वाटतोस.” यावर, ती व्यक्ती उत्तरादाखल हार्ट इमोजी पाठवते. मग अभिनेत्री लिहिते, “होय तू करतोस. माझी सर्व स्वप्ने आणि इच्छा पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद.” यावर त्या व्यक्तीचे उत्तर येते, “हे माझे भाग्य आहे. जेव्हा तुला काही हवे असेल, तेव्हा मला सांग.”

पाहा पोस्ट :

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

श्रद्धाच्या चाहत्यांनी पापाराझींना फटकारले!

श्रद्धा कपूरच्या वैयक्तिक गप्पांचे फोटो लीक केल्याबद्दल पापाराझींच्या या कृत्यामुळे सोशल मीडिया वापरकर्ते आणि श्रद्धाचे खूप संतापले आहेत आणि त्यांच्यावर तीव्र टीका करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, “जर हा केवळ एक विनोद (एडीटेड) असेल, तर तो खूप वाईट विनोद आहे!! कृपया अशा प्रकारे कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करू नका. अतिशय आत्मविश्वासाने काळकर छायाचित्रकारांना जवळ येऊ देतात.”

तर दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले, “बरं तुम्ही हे असं कसं करू शकता? त्यांनाही प्रायव्हसी हवी आहे.” दुसर्‍याने लिहिले, “थोडी लाज बाळगा, ही अत्यंत घृणास्पद कृती आहे.” अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि फोटोग्राफर रोहन श्रेष्ठ यांच्या नात्याच्या बातम्या अनेकदा चर्चेत येत असतात. काही लोक असाही अंदाज बांधत आहेत की, या चॅटमध्ये श्रद्धा रोहन श्रेष्ठशी बोलत आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, श्रद्धा कपूर लवकरच दिग्दर्शक लव रंजनच्या आगामी चित्रपटात प्रथमच रणबीर कपूरसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे.

(Shraddha Kapoor’s personal chat leaked on social media fans slammed the paparazzi)

हेही वाचा :

मलायका अरोराचा ग्लॅमरस फोटोशूट, लवकरच झळकणार ‘सुपर मॉडेल ऑफ द इयर सीझन 2’मध्ये

सीबीआय कोर्ट जिया खान प्रकरणाची सुनावणी करणार, सूरज पंचोलीला दिलासा मिळेणार?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI