एकेकाळी होते खाण्याचे वांदे, आणि आता आहे कोट्यावधीचा मालक, वाचा या साऊथच्या स्टारची स्टोरी

| Updated on: Feb 04, 2023 | 10:02 PM

आता ब्रह्मानंदम हे ६६ वर्षांचे असून या वयामध्येही ते प्रचंड मेहनत घेताना दिसतात. नावासोबतच ब्रह्मानंदम यांनी मोठी संपत्ती देखील कमावली आहे.

एकेकाळी होते खाण्याचे वांदे, आणि आता आहे कोट्यावधीचा मालक, वाचा या साऊथच्या स्टारची स्टोरी
Follow us on

मुंबई : साऊथच्या चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना पोट धरून हसवणारे ब्रह्मानंदम (Brahmanandam) यांनी तब्बल एक हजारपेक्षाही अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. साऊथच्या जवळपास सर्वच चित्रपटांमध्ये कॉमेडी करताना ब्रह्मानंदम दिसतात. विशेष म्हणजे त्यांच्या करिअरला आता तब्बल ३६ वर्ष झाले आहेत. ३६ वर्षांपासून ते चाहत्यांचे जबरदस्त मनोरंजन चित्रपटांच्या माध्यमातून करतात. विशेष म्हणजे ब्रह्मानंदम यांची मोठी फॅन फाॅलोइंग (Fan following देखील सोशल मीडियावर (Social media) बघायला मिळते. ब्रह्मानंदम यांना अनेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले असून आंध्रप्रदेशच्या मुपल्ला या छोट्याशा गावामध्ये त्यांचा जन्म झालाय. आता ब्रह्मानंदम हे ६६ वर्षांचे असून या वयामध्येही ते प्रचंड मेहनत घेताना दिसतात. नावासोबतच ब्रह्मानंदम यांनी मोठी संपत्ती देखील कमावली आहे.

ब्रह्मानंदम यांच्या बालपणी त्यांच्या कुटुंबियाची अत्यंत हालाकिची परिस्थिती होती. इतकेच नाही तर एक वेळ त्यांना जेवायला देखील मिळत नव्हते. अत्यंत संघर्ष करून ब्रह्मानंदम यांनी स्वत: चे एक नाव तयार केले आहे.

2007 मध्ये ब्रह्मानंदम यांचे नाव 700 हून अधिक चित्रपट केल्याबद्दल गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नोंदवले गेले होते. इतकेच नाही तर याशिवाय 2009 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

कोणताही चित्रपट असो ब्रह्मानंदम हे कॉमेडी करताना दिसतात. ब्रह्मानंदम यांच्या कॉमेडीने चित्रपट हीट देखील ठरतात. ब्रह्मानंदम यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे.

आपल्या कॉमेडीच्या जोरावर ब्रह्मानंदम यांनी मोठी संपत्ती आणि नाव कमावले आहे. एकेकाळी खाण्याचे वांदे असलेले ब्रह्मानंदम यांची नेट संपत्ती सध्या 450 कोटी असून हैद्राबादमधील त्यांचा कोटींचा एक बंगला आहे.

ब्रह्मानंदम यांच्याकडे कारचे मोठे कलेक्शन देखील आहे. मर्सिडीज बेंज, इनोवा, ऑडीक्यू7 अशा महागड्या कार त्यांच्याकडे आहेत. 2009 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.