Kamaal R Khan : केआरकेचा नवा दावा म्हणाला, ‘अक्षय कुमार लवकरच अफगाणिस्तानवर चित्रपट बनवणार’

कमाल आर खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. त्याचे अनेक ट्विट्स देखील चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. अशा स्थितीत कमाल कोणत्याही स्टारला लक्ष्य करण्याची एकही संधी सोडत नाही. आता केआरकेनं ट्वीट करून अक्षय कुमार लवकरच अफगाणिस्तानवर चित्रपट बनवणार असल्याचं सांगितलं आहे. (KRK's new claim says, 'Akshay Kumar will make a film on Afghanistan')

Kamaal R Khan : केआरकेचा नवा दावा म्हणाला, अक्षय कुमार लवकरच अफगाणिस्तानवर चित्रपट बनवणार
| Edited By: | Updated on: Aug 24, 2021 | 9:38 AM

मुंबई : अभिनेता आणि समीक्षक कमाल आर खान (Kamaal R Khan) त्याच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. दिवसेंदिवस त्याचे आश्चर्यकारक विविध विधानं सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. कमाल दररोज कोणत्या ना कोणत्या स्टारला लक्ष्य करत असतो. नुकतंच त्यानं अक्षय कुमारबद्दल एक ट्विट केलं आहे.

कमाल आर खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. त्याचे अनेक ट्विट्स देखील चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. अशा स्थितीत कमाल कोणत्याही स्टारला लक्ष्य करण्याची एकही संधी सोडत नाही. आता केआरकेनं ट्वीट करून अक्षय कुमार लवकरच अफगाणिस्तानवर चित्रपट बनवणार असल्याचं सांगितलं आहे.

केआरकेचा नवा दावा

नुकतंच, कमाल आर खाननं ट्वीट केलं आणि लिहिलं की माझ्या सूत्रांनुसार, अक्षय कुमार आता अफगाणिस्तानवर चित्रपट बनवण्याचा विचार करत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार एका अफगाण शीखची भूमिका साकारणार आहे, जो तालिबानला पराभूत करेल आणि भारतीयांना एयरलिफ्ट करेल.

या ट्विटनं खिलाडी कुमारच्या चाहत्यांना धुमाकूळ घातला आहे. काही चाहत्यांनी अक्षय खरोखर असा चित्रपट बनवणार की नाही याचा अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे, तर काहींनी केआरकेचा भयंकर क्लास सुरू केला आहे. खरंतर अक्षय या प्रकारच्या लीगमधून चित्रपट बनवण्यासाठी ओळखला जातो.

कंगनावरही साधला निशाना

नुकतंच, केआरके प्रकाशझोतात आला जेव्हा त्यानं कंगना रनौतबद्दल ट्विट केलं आणि सांगितलं की ती कोणाला डेट करत आहे. वास्तविक, KRK नं कंगनाचे दोन फोटो देखील ट्विट केले होते, ज्यात ती एका व्यक्तीसोबत दिसत होती. फोटो शेअर करताना कमालनं दावा केला की, फोटोमधील अभिनेत्रीसोबत असलेला मुलगा इम्रान आहे आणि अभिनेत्री त्याला डेट करत आहे.

संबंधित बातम्या

Tejashree Pradhan : ‘टीव्हीची लाडकी सून’ तेजश्री प्रधानचं सोज्वळ रुप, पाहा खास फोटो

Shruti Marathe : पारंपारिक साज आणि निखळ हास्य, अभिनेत्री श्रुती मराठेचे हे फोटो पाहिलेत?

Devmanus : ‘ज्यांना माझं काम नाही आवडलं त्यांना…’, ‘देवमाणूस’ मालिकेतील डॉक्टर अजित कुमार देवची खास पोस्ट