AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tejashree Pradhan : ‘टीव्हीची लाडकी सून’ तेजश्री प्रधानचं सोज्वळ रुप, पाहा खास फोटो

‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेतील शुभ्राच्या व्यक्तिरेखेतून अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. (Tejashree Pradhan's amazing photos, shared on social media)

| Edited By: VN | Updated on: Aug 24, 2021 | 9:16 AM
Share
‘अग्गंबाई सासूबाई’, ‘होणार सून मी ह्या घरची’ यासारख्या मालिकांमधून अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) हिने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. छोट्या पडद्यासोबतच रंगभूमी, मराठी चित्रपट आणि बॉलिवूडमध्येही तेजश्री प्रधानने धडक मारली आहे.

1 / 5
आता नुकतंच तेजश्रीनं तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे.

2 / 5
‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेतील शुभ्राच्या व्यक्तिरेखेतून अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. गेली दीड वर्ष तिने शुभ्राची भूमिका साकारली.

3 / 5
झी मराठी वाहिनीवरील ‘होणार सून मी ह्या घरची’ (Honar Soon Me Hya Gharchi) मालिकेतील जान्हवीच्या व्यक्तिरेखेने तेजश्री प्रधान लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. 2013 ते 2016 या साडेतीन वर्षांच्या कालावधीत श्री-जान्हवीच्या जोडीचं प्रेक्षकांवर गारुड होतं. तिचा ‘काहीही हं श्री’ हा डायलॉग तर अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. सहा सासवांची लाडकी सून प्रेक्षकांना आपल्या घरची वाटू लागली. अगदी झी मराठी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट नायिका, सून, जोडी अशा सर्वच महत्त्वाच्या पुरस्कारांवर सलग तीन वर्ष तिने नाव कोरलं.

4 / 5
‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेने तिला 2013 मध्ये ओळख दिली असली, तरी तेजश्री त्याआधीपासूनच मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. 2007 मध्ये त्यावेळच्या ईटीव्ही मराठी वाहिनीवर ‘ह्या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेने कमालीची लोकप्रियता मिळवली होती. तेजश्री या मालिकेचा भाग होती. आनंद अभ्यंकर, गिरीश ओक, वंदना गुप्ते, सई ताम्हणकर, प्रदीप वेलणकर अशा एकापेक्षा एक कलाकारांसोबत काम करण्याची संधी तिला मिळाली.

5 / 5
Follow Us
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर

छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...