Liger First Glimpse : लोकल स्ट्रीट ते बॉक्सिंग रिंग, दमदार अ‍ॅक्शनसह विजय देवरकोंडा प्रेक्षकांच्या भेटीला!

अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांच्या मोस्ट अवेटेड 'लायगर' या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. त्याची रिलीज डेट आधीच जाहीर करण्यात आली होती, पण प्रत्येकजण त्याच्या पहिल्या झलकेची आतुरतेने वाट पाहत होते.

Liger First Glimpse : लोकल स्ट्रीट ते बॉक्सिंग रिंग, दमदार अ‍ॅक्शनसह विजय देवरकोंडा प्रेक्षकांच्या भेटीला!
Liger
Follow us
| Updated on: Dec 31, 2021 | 12:06 PM

मुंबई : अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांच्या मोस्ट अवेटेड ‘लायगर’ या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. त्याची रिलीज डेट आधीच जाहीर करण्यात आली होती, पण प्रत्येकजण त्याच्या पहिल्या झलकेची आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी आज त्याची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आणण्याची घोषणा केली आहे आणि ती आता प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा आता बॉलिवूडमध्येही धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे.

विजय देवरकोंडा याच्या व्यक्तिरेखेबद्दल सांगणारा हा 53 सेकंदांचा व्हिडीओ अॅक्शनने परिपूर्ण आहे. या चित्रपटात विजय एक उत्कट फायटर म्हणून दाखवण्यात आला आहे. तो प्रथम रस्त्यावर आणि नंतर बॉक्सिंग रिंगमध्ये सर्वांना मारताना दिसत आहे. विजयचा हा लूक सर्वांनाच आवडणार आहे. या भूमिकेसाठी त्याने एक उत्तम शरीरयष्टीही कमावली आहे. टीझरमध्ये रोनित रॉय त्याच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. विजय यात चायवाला म्हणूनही दिसत आहे.

पुढील वर्षी प्रदर्शित होणार चित्रपट!

प्रसिद्ध दिग्दर्शक पुरी जगन्नाथ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. त्याचबरोबर या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने पार पाडली आहे. करणने या चित्रपटाचे पोस्टर खूप आधी रिलीज केले होते. त्यानंतर त्याची रिलीज डेट समोर आली आणि काही दिवसांपूर्वीच 31 डिसेंबर 2021 रोजी त्याची पहिली झलक प्रेक्षकांसमोर येणार असल्याची घोषणा करण्यात आली. बॉलिवूड आणि साऊथमधील अनेक सेलिब्रिटी या चित्रपटाशी जोडले गेले आहेत. म्हणून तो 25 ऑगस्ट 2022 रोजी हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होईल.

दिग्गज बॉक्सर माईक टायसनही मुख्य भूमिकेत

या चित्रपटाच्या चर्चेचे एक प्रमुख कारण म्हणजे दिग्गज बॉक्सर माईक टायसन. तो पहिल्यांदाच भारतीय चित्रपटात काम करताना दिसणार आहे. या चित्रपटात तो विजयच्या प्रतिस्पर्ध्याच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडा आणि माइक टायसन यांच्याशिवाय अनन्या पांडे, रम्या कृष्णन, रोनित रॉय आणि मकरंद देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विजय देवरकोंडा या चित्रपटात बॉक्सरच्या भूमिकेत आहे. त्याची पहिली झलक नुकतीच आली असून ती प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासाठी पुरेशी आहे.

हेही वाचा :

RRR Movie Release | ओमिक्रॉन-कोरोनाचं संकट तरीही मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार ‘RRR’, निर्मात्यांचा मोठा निर्णय!

Shilpa Shirodkar | सगळ्यात पहिली ‘लसवंत’ अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह! शिल्पा शिरोडकर विषाणूच्या विळख्यात!

अभिनेत्री पूजा सावंत, चिन्मय उदगीरकर यांना सुविचार गौरव पुरस्कार; मंत्री जयंत पाटलांच्या हस्ते नाशिकमध्ये होणार सन्मान

Non Stop LIVE Update
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.