
बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने कायमच तिच्या अभिनयाने आणि तिच्या सौंदर्याने सर्वांना घायाळ केलं आहे. आजही तिची क्रेझ कमी झालेली नाहीये. शिवाय माधुरी ही केवळ तिच्या ग्लॅमरस लूकसाठी, उत्तम अभिनयासाठी आणि आकर्षक शैलीसाठी ओळखली जात नाही तर ती तिच्या प्रत्येक प्रोजेक्टवर खूप मेहनत घेताना दिसते. पण असे अनेक चित्रपट आहेत की त्यातील काही सीन्ससाठी माधुरीला अडचणींचा सामना करावा लागला.
गाणे शुट करतेवेळी माधुरी दीक्षितला आला भयानक अनुभव
एवढंच नाही तर माधुरी दीक्षितच्या दमदार अभिनयासोबतच, तिच्या डान्सिंगचेही तेवढेच चाहते आहेत. माधुरीची गणना सर्वोत्तम डान्सिंग स्टार्समध्ये केली जाते. एका चित्रपटात गाणे शुट करतेवेळी तिला जो काही भयानक अनुभव आला तो तिने एका शोमध्ये सांगितला होता. बर्फाळ पर्वतांमध्ये अतिशय कमी डिग्रीच्या वातावरणात शूट करत होती. या गाण्यावेळी तिला शिफॉनची साडी नेसून शूट करायचं होतं त्यामुळे तिची तब्येत बिघडत चालली होती. थंडीमुळे माधुरीची प्रकृती खूपच खराब झाली होती.
शिफॉन साडीमध्ये चक्क -30 अंश सेल्सिअसमध्ये शुटींग
‘पुकार’ चित्रपटातील ‘किस्मत से तुम’ हे गाणे बर्फाळ पर्वतांमध्ये चित्रित केलं गेलं आहे. या गाण्याच्या शूटिंग दरम्यान, माधुरीची प्रकृती खूपच खराब झाली आणि थंडीमुळे ती खूप थरथर कापू लागली होती. एका मुलाखतीत माधुरीने सांगितले होते की, “अनिल कपूरला हा सीन टी-शर्टमध्ये शूट करायचा होता आणि मला शिफॉन साडीमध्ये शूट करायचं होतं. पहिल्या दिवशी, प्रचंड थंडीमुळे आम्हाला चित्रीकरण करता आले नाही.”
pukar song
माझे ओठ पूर्णपणे निळे पडले
माधुरीने पुढे सांगितले की चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कोरिओग्राफर तिला गाणे सिंक करण्यास सांगत होती पण तिचे ओठ गोठले होते. तिने म्हटंल की तिला तिचे ओठही हलवता येत नव्हते. हे गाणं एका बर्फाळ हिमनदीच्यावर (ग्लेशियर) चित्रित करण्यात आलं होतं जिथे खूप थंडी होती. माधुरी या घटनेबद्दल सांगितले की “फराह खान सतत आम्हाला गाण्याचे बोल म्हणायला सांगत होती पण थंडीमुळे माझे ओठही हलू शकत नव्हते. यावेळी संध्याकाळ झाली होती आणि तापमान आणखी कमी झाले होते. त्या दिवशी माझी प्रकृती इतकी बिकट झाली होती की माझे ओठ पूर्णपणे निळे पडले होते आणि मी थंडीने थरथर कापत होते. सेटवर एक डॉक्टर देखील होते आणि त्यांनी खबरदारी म्हणून शूट रद्द केले होते.”
यानंतरच्या शूटिंगबद्दल माधुरी म्हणाली की, “त्यानंतर, शूटिंगवेळी एक माणूस नेहमी माझ्यासाठी चादर घेऊन तयार असायचा. टेक संपताच, तो माझ्याकडे धावत यायचा आणि मला ती चादर द्यायचा. जेणेकरून मला थोडी ऊब मिळायची.
-30 ते -40 अंश सेल्सिअसमध्ये गाणं शूट केलंय
तसेच अनिल कपूरनेही हा प्रसंग सांगत म्हटलं “आम्ही शूटिंगला सुरुवात केली तेव्हा तेथील तापमान मायनस मध्ये होतं. साधारण -30 ते -40 अंश सेल्सिअसमध्ये आम्ही ते गाणं शूट केलंय. त्यावेळी मी वेशभूषेवर अगदी बारकाईने लक्ष दिलं होतं. माधुरीने शिफॉन साडी नेसली होती तर, दुसरीकडे मी कडाक्याच्या थंडीमुळे जवळपास 6-7 स्वेटर घातले होते.”
माधुरी आणि अनिलची जोडी एकेकाळी सुपरहिट मानली जात होती. दोघांनीही एकत्र अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांचे पुकार, राम लखन, किशन कन्हैया आणि तेजाब हे दोन्ही चित्रपट खूप आवडले.