माधुरीचं 28 वर्ष जुनं गाणं… रस्त्यावरून लोकांना उचललं, शर्ट उडवताच बनलं कल्ट…

माधुरी दीक्षितच्या 'एक दोन तीन' गाण्याला आज २८ वर्षे झाली तरी त्याची मोहिनी कायम आहे. रस्त्यावरून लोकांना आणून त्यांना गाण्यात नाचवल्याने आणि त्यातील एकाने शर्ट उडवल्याने हे गाणं कल्ट बनलं. माधुरीच्या अदा, संगीत आणि या अनोख्या प्रसंगाने गाणं अजूनही लोकप्रिय आहे.

माधुरीचं 28 वर्ष जुनं गाणं... रस्त्यावरून लोकांना उचललं, शर्ट उडवताच बनलं कल्ट...
Madhuri Dixit
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jun 14, 2026 | 9:48 PM

Madhuri Dixit Song Ek Do Teen : बॉलिवूडमध्ये असंख्य गाणी आहेत. अविट गोडीची, रसाळ आणि मधाळ. यातील प्रत्येक गाण्याची गोडी काही औरच आहे. आजही असंख्य गाणी लोक गुणगुणत असतात. पण काही गाणी अशी असतात की त्याला तोडच नाही. 90च्या दशकानेही अशीच गाणी दिली. पण त्यातील एक गाणं आजही कल्ट गाण्यात समाविष्ट आहे. आपल्या मराठमोळ्या माधुरीचं हे गाणं. माधुरी दीक्षितच्या 90च्या दशकातील या गाण्याची जादू आजही कायम आहे. त्या काळात तर या गाण्यावर लोक ठेका धरायचे. गाण्याचे बोल, संगीत आणि माधुरीच्या डान्स स्टेप्सने तर कहरच उडवला होता. त्यातल्या माधुरीच्या आदा तर लय भारी. विशेष म्हणजे हे गाणं त्या काळातील आयटम नंबर होतं. आज 28 वर्षानंतरही हे गाणं हिट आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गाण्यात नाचण्यासाठी रस्त्यावरून उचलून लोकांना आणलं होतं.

माधुरी दीक्षितचा मां बहन हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफिलिक्सवर हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाला लोकांची चांगली पसंती मिळत आहे. या सिनेमात तृप्ती डिमरी आणि रवी किशन हे स्टार्सही आहेत. या सिनेमाच्या प्रमोटिंगसाठी माधुरी एका पॉडकास्टला गेली होती. त्यावेळी तिने 28 वर्ष जुन्या तिच्या एक दोन तीन या गाण्यावरही भाष्य केलं होतं.

रस्त्यावरची लोकं…

माधुरीने या गाण्याचे किस्से सांगितले. माधुरी म्हणाले, मेकर्सला टॉप शॉर्ट हवा होता. तर काय करायचं? असा प्रश्न पडला. त्यावेळी रस्त्यावरून लोकांना उचलायचं असं ठरलं. मग रस्त्यावर काही लोक उभे राहिले आणि जो मिळेल त्याला तुम्ही सिनेमात काम करणार का? अशी विचारणा सुरू झाली. होकार मिळताच, या आत असं म्हणत आतमध्ये घेतलं. असं करत करत असंख्य लोकांना रस्त्यावरून उचलून शुटिंग स्थळी आणलं. आणि या लोकांनी गाण्यात डान्स केला. हे लोक ज्युनिअर आर्टिस्ट नव्हते. सामान्य लोक होते. त्यातील एकाने तर गाणं सुरू असतानाच आपल्या अंगातील शर्ट काढून हवेत उडवली होती.

अन् गाणं कल्ट झालं…

हवेत शर्ट उडवणारा व्यक्ती अधिकच एक्साईट झाला होता. तो ज्युनिअर आर्टिस्ट नव्हता. असाच एक व्यक्ती होता. एन. चंद्रा यांनी हा प्रकार पाहिला आणि म्हणाले अरे मला हे खूप आवडलं. सर्वच लोकांनी असं केलं पाहिजे. भाई लोग सर्वांनी शर्ट काढून हवेत उडवायचं आहे, असं एन. चंद्रांनी सांगितलं, असं माधुरी म्हणाली. माधुरीची एनर्जी आणि डान्स करणाऱ्यांचं हवेत शर्ट उडवणं यामुळे हे गाणं कल्ट झालं. आजही हे गाणं तितकंच लोकप्रिय आहे.

रिमेक आला…

माधुरीचं एक दोन तीन… हे गाणं आजही हीट आहे. या गाण्याचा रिमेकही आलं आहे. टायगर श्रॉफची फिल्म बागी-2मध्ये जॅकलीन फर्नांडिसवर हे गाणं शूट झालंय. 20 वर्षानंतर आलेल्या या रिमेकलाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. जॅकलीनचं हे गाणंही रातोरात व्हायरल झालं होतं.

Follow Us