Malaika Arora : कोविडमुळे एकमेकांपासून दूर, मलायकानं अर्जुनला नववर्षाच्या दिल्या खास शुभेच्छा
मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) बॉलिवूड(Bollywood)मधल्या लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मलायकानं इन्स्टाग्राम(Instagram)वर अर्जुन कपूरसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे.

मुंबई : मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) बॉलिवूड(Bollywood)मधल्या लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दरम्यान, अर्जुन कपूरला पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली असून त्यानं स्वत:ला क्वारंटाइन केलंय. त्यामुळे नवीन वर्षाच्या मुहूर्तावर तो मलायका अरोराला भेटू शकला नाही. अशा परिस्थितीत मलायका अरोराला अर्जुन कपूरची आठवण येतेय.
मालदीवचा फोटो शेअर
मलायकानं इन्स्टाग्राम(Instagram)वर अर्जुन कपूरसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. तो सध्या प्रचंड व्हायरल होतोय. तिनं कॅप्शनमध्ये लिहिलंय, की ‘मी तुला मिस करत आहे मिस्टर पाउटी. नवीन वर्षाच्या शुभेच्छा.’ यासोबतच तिनं हार्ट इमोजीही पोस्ट केलीय. फोटोमध्ये मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर दिसत आहेत. खरंतर, हा फोटो अर्जुन कपूर आणि मलायकाच्या मालदीव व्हेकेशनचा आहे. तिथं दोघांनी एकमेकांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड केला.
काही दिवसांपूर्वीच झाली कोविडची लागण
काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूरसह अंशुला, रिया कपूर आणि तिचा पती करण बुलानी यांना कोरोनाची लागण झाली. सध्या सर्वजण क्वारंटाइन असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. अर्जुन कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर मलायका अरोराची कोविड चाचणीही करण्यात आली होती, मात्र ती निगेटिव्ह आली होती.
वर्कफ्रन्ट
मलायका अरोरा सध्या ‘इंडियाज बेस्ट डान्सर 2’ या रिअॅलिटी डान्स शोला जज करतेय. त्याच्यासोबत गीता कपूर आणि टॅरेन्स लुईसही या शोचे जज आहेत. अर्जुन कपूर ‘संदीप और पिंकी’ फरारमध्ये दिसला होता, त्यात त्यानं पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका केली होती. या चित्रपटात परिणीती चोप्रानं मुख्य भूमिका साकारली होती. मात्र, या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.