Money Heist 5 | मुंबई पोलिसांवर दिसली ‘मनी हाईस्ट’ची जादू, Bella Ciao गाण्यावर खाकी वर्दीने वाजवला बँड, पाहा व्हिडीओ

मनी हाईस्टच्या पाचव्या सीझनचा (Money Heist 5) पहिला खंड अखेर रिलीज झाला आहे. चाहते या सीझनची बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. त्याचवेळी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) देखील या शोचा ट्रेंड एका वेगळ्याच प्रकारे फॉलो केला आहे.

Money Heist 5 | मुंबई पोलिसांवर दिसली ‘मनी हाईस्ट’ची जादू, Bella Ciao गाण्यावर खाकी वर्दीने वाजवला बँड, पाहा व्हिडीओ
बेला चाओ
| Edited By: | Updated on: Sep 04, 2021 | 10:35 AM

मुंबई : मनी हाईस्टच्या पाचव्या सीझनचा (Money Heist 5) पहिला खंड अखेर रिलीज झाला आहे. चाहते या सीझनची बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. त्याचवेळी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) देखील या शोचा ट्रेंड एका वेगळ्याच प्रकारे फॉलो केला आहे. वास्तविक, मुंबई पोलिसांच्या बँडने या सीरीजच्या ‘बेला चाओ’ (Bella Ciao) या गाण्याचे इन्स्ट्रुमेंट व्हर्जन रिलीज केले आहे, जे सोशल मीडियावर हिट झाले आहे. मुंबई पोलिसांचा हा बँड ‘खाकी स्टुडिओ’ नावाने ओळखला जातो. मुंबई पोलिसांनी बँडचा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात सर्वजण वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट व्हर्जन वाजवत आहेत.

नेहमीप्रमाणे ट्रेंडला अनुसरून, मुंबई पोलिसांनी पुन्हा काहीतरी मजेदार सदर केले आणि मनी हाईस्टच्या ‘बेला चाओ’ या गाण्याचे इन्स्ट्रुमेंट व्हर्जन वाजवले. व्हिडीओ शेअर करताना मुंबई पोलिसांनी लिहिले, ‘नेहमी काहीतरी नवीन करण्याचा ट्रेंड करण्याचा प्रयत्न करा. सुरक्षेचा सीझन कधीही संपू देऊ नका. ‘बेला चाओ’सह खाकी स्टुडिओ पुन्हा एकदा तुमचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.

पाहा व्हिडीओ

दुसरीकडे, मुंबई पोलिसांनी इन्स्टाग्रामवर दुसरा व्हिडीओ शेअर केला आणि लिहिले, ‘बेला चाओ’चा ट्रेलर आवडला? तर, तुम्हाला पुढील देखील आवडेल कारण खाकी नेहमीच सर्व काही चांगले करते. या व्हिडीओला खूप पसंती मिळत आहे. चाहते त्यांना ‘रॉक स्टार’ म्हणत आहेत. तर, काही लोक त्यांची खिल्ली देखील उडवत आहेत आणि म्हणत आहेत की, मुंबई पोलीस चोरांसाठी गायलेल्या गाण्यांचे संगीत वाजवत आहेत.

पाहा पोस्ट

मनी हाईस्टबद्दल बोलायचे तर, या शोचा पाचवा आणि शेवटचा सीझन 1.5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रिलीज झाला आहे. शोचा पहिला खंड शुक्रवारी म्हणजेच 3 सप्टेंबर रोजी रिलीज झाला आहे आणि आता दुसरा खंड डिसेंबरमध्ये रिलीज होईल.

या भागात हे दाखवण्यात आले आहे की, प्रोफेसरला पोलीस अधिकारी अॅलिसिया पकडते आणि ती त्याच्यावर अत्याचार करत आहे. त्याच वेळी, प्रोफेसरची टीम बँक ऑफ स्पेनमध्ये सैन्याशी लढत आहे. चाहत्यांना वाटते की, या भागात काही पात्रांचा मृत्यू होऊ शकतो. त्याच वेळी, हे देखील अपेक्षित आहे की, प्रोफेसर आणि बर्लिनची काही बॅकअप योजना असेल.

प्रोफेसरची नवी खेळी

सीझन 5च्या पहिल्या भागात, कळते की अॅलिसिया सिएरा अद्याप प्रोफेसरला मारू शकत नाही. कारण पोलीस स्वतः तिची चौकशी करत आहेत. जर, तिने प्रोफेसरला मारून बदला घेतला, तर तिचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. ती त्याच्यावर सूड घेण्यासाठी भरपूर अत्याचार करत आहे. अॅलिसियाची इच्छा आहे की, प्रोफेसरने त्याचा संपूर्ण प्लॅन तिच्यासमोर ठेवावा, जेणेकरून ती प्रोफेसरच्या टीमला पकडू शकेल. आता या मालिकेची संपूर्ण कमांड अॅलिसियाच्या हातात गेली आहे. दुसरीकडे, रकेल, अजूनही बँक ऑफ स्पेनमध्ये उपस्थित आहे, जिथे रकेलने आता सर्वांना बाहेर काढण्याची जबाबदारी आपल्या हाती घेतली आहे.

हेही वाचा :

Money Heist 5 Release Time : उरलेयत अवघे काहीच तास, जाणून घ्या ‘मनी हाईस्ट 5’ कुठे आणि किती वाजता पाहता येणार?

Money Heist 5 | ‘मनी हाईस्ट 5’ची उत्सुकता शिगेला, यावेळी होणार मोठा धमाका! पाहा प्रत्येक भागाची झलक…

Money Heist 5 | क्राईम थ्रिलर ड्रामा ‘मनी हाईस्ट 5’ प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा कथेत आतापर्यंत काय काय घडलं…