Money Heist Season 5 Review : प्रोफेसर अ‍ॅलिसियाच्या ताब्यात, अ‍ॅक्शन मोडमध्ये आलेल्या रकेलने घेतला टीमचा चार्ज!

‘मनी हाईस्ट सीझन 5’ भारतात काही वेळापूर्वीच नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. जिथे प्रेक्षक गेल्या 1 वर्षापासून त्याची वाट पाहत होते. मात्र, सीझन 5चे फक्त 5 भाग रिलीज झाले आहेत. जे खूप धमाकेदार आहेत. नेटफ्लिक्सची टीम पुढील भाग 3 डिसेंबरला रिलीज करेल. जिथे चौथा सीझन संपतो, तिथे सीझन 5चा पहिला भाग सुरू होतो.

Money Heist Season 5 Review : प्रोफेसर अ‍ॅलिसियाच्या ताब्यात, अ‍ॅक्शन मोडमध्ये आलेल्या रकेलने घेतला टीमचा चार्ज!
मनी हाईस्ट 5

सीरीज : मनी हास्ट सीझन 5

कुठे पाहाल : नेटफ्लिक्स

‘मनी हाईस्ट सीझन 5’ भारतात काही वेळापूर्वीच नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. जिथे प्रेक्षक गेल्या 1 वर्षापासून त्याची वाट पाहत होते. मात्र, सीझन 5चे फक्त 5 भाग रिलीज झाले आहेत. जे खूप धमाकेदार आहेत. नेटफ्लिक्सची टीम पुढील भाग 3 डिसेंबरला रिलीज करेल. जिथे चौथा सीझन संपतो, तिथे सीझन 5चा पहिला भाग सुरू होतो. पोलिसांच्या तावडीतून सुटून प्रोफेसरने त्याच्याकडे असलेली प्रत्येक लढाई जिंकली आहे. पण आता हा सीझन शेवटचा असणार आहे. प्रोफेसर आता पोलीस इन्स्पेक्टर अ‍ॅलिसिया सिएराच्या तावडीत सापडणार आहे. अॅलिसिया आता प्रोफेसरच्या ठावठिकाणी पोहोचली आहे (Money Heist Season 5 Review).

सीझन 5च्या पहिल्या भागात, कळते की अॅलिसिया सिएरा अद्याप प्रोफेसरला मारू शकत नाही. कारण पोलीस स्वतः तिची चौकशी करत आहेत. जर, तिने प्रोफेसरला मारून बदला घेतला, तर तिचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. ती त्याच्यावर सूड घेण्यासाठी भरपूर अत्याचार करत आहे. अॅलिसियाची इच्छा आहे की, प्रोफेसरने त्याचा संपूर्ण प्लॅन तिच्यासमोर ठेवावा, जेणेकरून ती प्रोफेसरच्या टीमला पकडू शकेल. आता या मालिकेची संपूर्ण कमांड अॅलिसियाच्या हातात गेली आहे. दुसरीकडे, रकेल, अजूनही बँक ऑफ स्पेनमध्ये उपस्थित आहे, जिथे रकेलने आता सर्वांना बाहेर काढण्याची जबाबदारी आपल्या हाती घेतली आहे.

रकेलची योजना

रकेल टीमला म्हणते की, आतापर्यंत वितळलेले सर्व सोने फक्त तेवढेच बँकेतून बाहेर पडावे लागेल. या सीरीजच्या या भागात राकेल हेलिकॉप्टरचा वापर करते, त्यासोबत व्होल्वो कार देखील जबरदस्त पद्धतीने वापरते. दुसऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला आणखी धमाकेदार सीन पाहायला मिळतील, जे ही सीरीज एका वेगळ्या पातळीवर घेऊन जातील. मालिकेचा हा शेवटचा सीझन आहे, यामुळे हा शेवट प्रेक्षकांसाठी खूप खास बनवण्यात येईल. मालिका बरीच थरारक बनवण्यातआली आहे, जी प्रेक्षकांना खूप आवडेल.

गांधींयाच्या शरीरावर लावला बॉम्ब

मालिकेच्या दुसऱ्या भागात, रकेलने आता स्वतःहून बरेच मोठे निर्णय घेतले आहेत, जिथे तिने ठरवले आहे की ती आता तिच्या काही सहकाऱ्यांसह बँकेच्या बाहेर जाईल. रकेल गांधीयाच्या शरीरावर बॉम्ब ठेवतो आणि त्याला बँक ऑफ स्पेनच्या बाहेर पाठवते. उर्वरित भागात आपण आणखी जादू पाहणार आहेत. परंतु, या सीरीजचा खरा आनंद घेण्यासाठी तुम्हाला ही वेब सीरीज पाहावीच लागेल.

हेही वाचा :

Money Heist 5 Release Time : उरलेयत अवघे काहीच तास, जाणून घ्या ‘मनी हाईस्ट 5’ कुठे आणि किती वाजता पाहता येणार?

Money Heist 5 | ‘मनी हाईस्ट 5’ची उत्सुकता शिगेला, यावेळी होणार मोठा धमाका! पाहा प्रत्येक भागाची झलक…

Money Heist 5 | क्राईम थ्रिलर ड्रामा ‘मनी हाईस्ट 5’ प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा कथेत आतापर्यंत काय काय घडलं…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI