सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देणारा मुंबई पोलिसांच्या ताब्यात, लॉरेन्स बिश्नोई याच्यासोबत कनेक्शन?

| Updated on: Mar 26, 2023 | 7:16 PM

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याला काही दिवसांपूर्वी ईमेल करून थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीनंतर सलमान खान याच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आली. आता याचप्रकरणात अत्यंत मोठी अपडेट पुढे आलीये.

सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देणारा मुंबई पोलिसांच्या ताब्यात, लॉरेन्स बिश्नोई याच्यासोबत कनेक्शन?
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याला काही दिवसांपूर्वी ईमेल करून थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. इतकेच नाहीतर सलमान खान याच्या सुरक्षेमध्येही मोठी वाढ करण्यात आली. कारण या धमकीच्या ईमेल अगोदर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याने जेलमधून एका मुलाखती वेळी सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीनंतर सलमान खान याच्या सुरक्षेमध्ये मुंबई पोलिसांनी वाढ केली. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सलमान खान याच्या घराबाहेरील सुरक्षाही वाढवली.

सलमान खान याला लॉरेन्स बिश्नोई याने धमकी दिल्यानंतर एक ईमेलही पाठवण्यात आला. या ईमेलमध्ये सलमान खान याला जीवे मारणार असल्याचे म्हटले होते. आता याप्रकरणातील मोठे अपडेट पुढे आले असून मुंबई पोलिसांनी सलमान खान याला जीवे मारण्याचा ईमेल पाठवणाऱ्याला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी थेट राजस्थानमधून ताब्यात घेतले. विशेष म्हणजे याचे थेट लॉरेन्स बिश्नोई याच्यासोबत कनेक्शन असल्याचे देखील सांगितले जातंय.

धक्कादायक बाब म्हणजे मुंबई पोलिसांनी ज्याला अटक केले आहे, त्याचे संबंध लॉरेन्स बिश्नोई याच्यासोबत असल्याचेही कळत आहे. यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमकीचा ईमेल पाठवणाऱ्याला जोधपुरमधून ताब्यात घेण्यात आलंय. हैराण करणारी गोष्टी म्हणजे फक्त सलमान खान यालाच नाहीतर या व्यक्तीने यापूर्वी सिद्धू मूसेवालाच्या वडिलांही जीवे मारण्याची धमकी दिलीये. ईमेल करून सलमान खान याला  धमकी देणाऱ्याचे नाव धाकड राम विश्नोई आहे.

मुंबई आणि जोधपूर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला जोधपूर येथील रोहीचा काला येथून ताब्यात घेतले आहे. म्हणजेच सलमान खान याला ईमेल करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी आता ताब्यात घेतले आहे. ज्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, त्याच्यावर सरदारपुरा येथे 2022 मध्ये शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचाही पोलिस तपास करत आहेत.

सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमकीचा ईमेल आल्यानंतर त्याच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली. ज्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तो लॉरेन्स बिश्नोई यांच्या संपर्कात असल्याचा अंदाज आहे. एका मुलाखतीमध्ये लॉरेन्स बिश्नोई म्हणाला की, सलमान खान याने माझ्या समाजाची माफी मागावी. सलमान खान याने माफी मागितली तर मी त्याला सोडून देईल. लॉरेन्स बिश्नोई हा सतत सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे.