Nawazuddin Siddiqui | नवाजुद्दीन सिद्दीकी न्यायालयात हजर नाही, वकिलाने उचलले मोठे पाऊल, पुढील सुनावणी

आलिया सिद्दीकीने अंधेरी न्यायालयात (Andheri Court) नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे.

Nawazuddin Siddiqui | नवाजुद्दीन सिद्दीकी न्यायालयात हजर नाही, वकिलाने उचलले मोठे पाऊल, पुढील सुनावणी
Nawazuddin Siddiqui
| Updated on: Feb 07, 2023 | 6:37 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे प्रचंड चर्चेत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या पत्नीने त्याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. आता हे सर्व प्रकरण थेट न्यायालयात पोहचले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याची पत्नी आलिया (Aaliya Siddiqui)  हिने टॉर्चर केल्याचा देखील आरोप केलाय. काही दिवसांपूर्वी आलिया हिच्या वकिलाने म्हटले होते की, आलिया यांना बाथरुम वापरण्यापासून रोखण्यात आले. इतकेच नाही तर बेडरूममध्ये झोपण्यासही मनाई करत बेडरूम लाॅक करण्यात आले. नवाजुद्दीन सिद्दीकी याने मुलांचे खर्च उचलण्यासही नकार दिला. आलिया सिद्दीकीने अंधेरी न्यायालयात (Andheri Court) नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या पत्नीमधील वाद वाढताना दिसत आहे.

आलिया हिच्या तक्रारीनंतर न्यायालयाने या प्रकरणात नवाजुद्दीन सिद्दीकी याला नोटीस पाठवली होती. आलियाच्या तक्रारीनंतर नवाजुद्दीन याला त्याच्या कुटुंबियांसोबत आज अंधेरी न्यायालयात जबाब नोंदवण्यासाठी हजर राहायचे होते.

न्यायालयाच्या नोटीसनंतरही नवाजुद्दीन सिद्दीकीच्या कुटुंबियांच्या वतीने कोणीही न्यायालयात हजर झाले नाही. इतकेच नाही तर नवाजुद्दीन सिद्दीकी याचे वकिलही न्यायालयात हजर राहिले नाहीत.

आलियाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी न्यायालयात एक्‍सपार्ट ऑर्डरसाठी अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी ही आता १० फेब्रुवारीला होणार आहे. १० फेब्रुवारीला नवाजुद्दीन सिद्दीकी किंवा त्याच्या कुटुंबियांपैकी कोणी उपस्थित राहते का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या पत्नीने त्याच्यावर केलेल्या गंभीर आरोपांनंतर त्याच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग देखील आहे.

आलिया ही नवाजुद्दीन सिद्दीकी याची दुसरी पत्नी आहे. मात्र, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याचे कुटुंबिय हे आलिया हिला गेल्या काही दिवसांपासून त्रास देत आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या आईचे आणि आलियाचे वाद संपत्तीवर असल्याचे देखील सांगतले जातंय.

नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या कुटुंबियांनी अगोदर आलिया विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर आलियाने नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या कुटुंबियावर आरोप केले. आता हा सर्व वाद कोर्टामध्ये पोहचला आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या पत्नीने थेट त्याच्या कुटुंबियांवर जेवायला देत नसल्याचा देखील आरोप केला आहे. न्यायालयाने नोटीस पाठवल्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आणि आता न्यायालयात जबाब नोंदवण्यासाठी नवाजुद्दीन सिद्दीकी हजर राहिला नसल्याने पुढे काय होते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.