ओळखलंत का हिला?; ही बया दुसरी तिसरी कोण नाही हा तर आपला…

इतर चित्रपटांपेक्षा या चित्रपटात काही तरी खास प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

ओळखलंत का हिला?; ही बया दुसरी तिसरी कोण नाही हा तर आपला...
| Updated on: Nov 17, 2022 | 6:18 PM

मुंबई : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या ‘हड्डी’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. नवाजुद्दीनचा या चित्रपटातील लूक रिलीज झाल्यापासून चाहते या चित्रपटाची वाट पाहात असून या चित्रपटाबद्दल कमालीची क्रेझ बघायला मिळत आहे. इतर चित्रपटांपेक्षा या चित्रपटात काही तरी खास प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. चित्रपटाचे पोस्ट रिलीज झाल्यावर सुरूवातीला नवाजुद्दीन सिद्दीकीचा लूक पाहून अनेकांना मोठा धक्काच बसला होता. कारण या पोस्टरमध्ये नवाजुद्दीन चक्क एका महिलेच्या लूकमध्ये दिसत आहे. या चित्रपटात नवाजुद्दीनने पूर्णपणे वेगळी भूमिका साकारली आहे.

हड्डी चित्रपटातून नवाजुद्दीन सिद्दीकी प्रेक्षकांसाठी काही तरी नवीन घेऊन येतोय, हे नक्कीच आहे. चित्रपटात पहिल्यांदाच नवाजुद्दीन ट्रान्सजेंडरची भूमिका साकारताना दिसणार आहे. यामुळे हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करणार असल्याची एक चर्चा सर्वत्र आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी याला ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणे आणि त्यांच्यासोबत काम करण्याच्या अनुभवावर विचारण्यात आले. त्यावेळी नवाजुद्दीन म्हणाला की, माझ्यासाठी खरोखरच हा अनुभव खूप जास्त स्पेशल आहे.

मी फक्त त्यांच्यासोबत काम केले नाही तर मला आयुष्यभराचा एक चांगला अनुभव मिळाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात नवाजुद्दीन याने रिअल 80 ट्रान्सजेंडर महिलांसोबत काम केले आहे. याचा अनुभव देखील नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितला आहे.

80 ट्रान्सजेंडर महिलांसोबत काम करण्याच्या अनुभवावर नवाजुद्दीन म्हणाला की, हा माझ्यासाठी एक अविश्वसनीय अनुभव आहे आणि खरोखरच माझ्यासाठी ही एक सन्मानाची बाब होती.

विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून मला या समाजाबद्दल जाणून घेण्यासाठी सुवर्णसंधीच मिळाली. हड्डी चित्रपटातील माझ्या भूमिकेमधून देखील मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत.

हड्डी चित्रपटातील नवाजुद्दीन सिद्दीकीचा लूक जबरदस्त आहे. नवाजुद्दीनने हिरव्या रंगाची साडी घातलीये, कपाळावर भलं मोठं कुंकू लावले आहे, नाकात नथ, गळ्यात पोत असा लूक नवाजुद्दीनचा दिसत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us