AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : थेट निलंबित करणार…देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले; मंत्र्यांना म्हणाले फक्त नाव सांगा; बैठकीत काय घडलं?

दिवळीआधी ज्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झालेले आहेत, त्या सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. तसेच 100 टक्के पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली जाणार आहे.

Devendra Fadnavis : थेट निलंबित करणार...देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले; मंत्र्यांना म्हणाले फक्त नाव सांगा; बैठकीत काय घडलं?
devendra fadnavis angryImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 14, 2026 | 6:30 PM
Share

Devendra Fadnavis : आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. दुष्काळ निवरणाचा मुद्दा आजच्या बैठकीत केंद्रस्थानी होता. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी काही तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. आता 305 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुसरी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सध्याची परिस्थिती लक्षात घेता अग्रीम रक्कम म्हणून सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, अशी घोषणा केली. सोबतच आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापल्याचे समोर आले आहे.

तर अधिकाऱ्यांना निलंबित करणार

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळासंदर्भात चर्चा सुरू होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते. या बैठकीत मंत्र्यांनी काही तक्रारी केल्या. सध्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका आहेत. त्यामुळे आचारसंहिता लागलेली आहे. निवडणूक आयोग परवानगी देत नाही म्हणून आम्ही दुष्काळाच्या बैठकीला येऊ शकत नाही, अशी कारणे अधिकाऱ्यांकडून दिली जात आहेत, असे मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यानंतर मात्र मुख्यमंत्री चांगलेच संतापले आगेत. आचारसंहितेचे कारण देत दुष्काळ बैठकीला एखादा अधिकारी अनुपस्थित राहिला तर त्याचे नाव मला सांगा. संंबंधित अधिकाऱ्याला थेट निलंबित केले जाईल, असा थेट इशारा फडणवीस यांनी दिला. दुष्काळ निवारणाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. लवकरात लवकर उपायोजना केल्या पाहिजेत. परवानगी घेण्याच्या भानगडीत पडू नका, असे निर्देशही फडणवीस यांनी दिले आहेत.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काय काय निर्णय?

दिवळीआधी ज्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झालेले आहेत, त्या सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. तसेच 100 टक्के पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली जाणार आहे. सोबतच मुख्यमंत्र्यांनी आणखी 40 तालुके दुष्काळग्रस्त आहेत, अशी घोषणा केली. शेतकऱ्यांना दिवाळीआधी 5000 रुपयांची अग्रीम मदत दिली जाणार आहे. राज्यातील साधारण सव्वा कोटी शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत केली जाणार आहे. राज्यभरात केली जाणारी ही मदत साधारण 6000 कोटी रुपये असणार आहे.

Follow Us
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून..
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ
ऐन नवरात्रीत तुळजापुरात दोन गटांत वाद, नेमकं काय घडलं?
Dharashiv : ऐन नवरात्रीत तुळजापुरात दोन गटांत वाद, नेमकं काय घडलं?
दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला.....
Rahul Gandhi PC : दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला धक्कादायक अनुभव
राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
Sangli NCP : समान नागरी कायद्याच्या विरोधाची भूमिका भोवली? राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?