‘बेशर्म रंग’च्या वादामध्येच पठाण चित्रपटातील दुसऱ्या गाण्याचा फर्स्ट लूक रिलीज, आता काय धमाल होणार?

या गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने मोठा वाद सुरू आहे.

बेशर्म रंगच्या वादामध्येच पठाण चित्रपटातील दुसऱ्या गाण्याचा फर्स्ट लूक रिलीज, आता काय धमाल होणार?
| Updated on: Dec 20, 2022 | 5:02 PM

मुंबई : शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट वादामध्ये अडकला आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरुखच्या चित्रपटामधील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाले आणि मोठा वाद निर्माण झाला. या गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने मोठा वाद सुरू आहे. इतकेच नाहीतर अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट चालू देणार नसल्याची भूमिका देखील अनेकांनी घेतली असून या चित्रपटाचा विरोध सातत्याने वाढताना दिसतोय. बेशर्म रंग या गाण्यामध्ये अनेक बोल्ड लूक दाखवण्यात आले आहेत. यावरही अनेकांना आक्षेप आहेत. आता याच चित्रपटातील दुसरे गाणे ‘झूमे जो’चा (Jhoome Jo) फर्स्ट लूक पुढे आलाय.

पठाण चित्रपटातील पहिल्याच गाण्यावरून इतका मोठा वाद सुरू असतानाच आता दुसरे गाणे रिलीज होण्यासाठी तयार आहे. विशेष म्हणजे याही गाण्यामध्ये दीपिका आणि शाहरुख खान बोल्ड लूकमध्ये दिसणार आहेत. गाण्याच्या फर्स्ट लूक पोस्टरमध्ये दीपिका आणि शाहरुख यांचा लूक जबरदस्त दिसत आहे.

बेशर्म रंग या गाण्यामुळे मोठा वाद सुरू असतानाच आता चित्रपटातील दुसरे गाणे रिलीज होण्यासाठी तयार आहे. बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यापासूनच सोशल मीडियावर बॉयकॉट पठाणचा ट्रेंड सुरू आहे. आता चित्रपटातील दुसरे गाणे काय धमाल करते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

पठाण चित्रपटातील बेशर्म रंग या गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने मोठा वाद सुरू आहे. इतकेच नाहीतर अनेक ठिकाणी शाहरुख खान आणि दीपिका विरोधात तक्रारही दाखल करण्यात आल्या. हा वाद कमी होत नाहीये, उलट वाढतानाच दिसतोय.

शाहरुख खान हा तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करतोय. विशेष म्हणजे याच वर्षी त्याचे तब्बल 3 बिग बजेटचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 2023 हे वर्ष शाहरुख खान याच्यासाठी नक्कीच खास आहे. परंतू पहिल्याच रिलीज होणार चित्रपट रिलीजच्या अगोदरच वादामध्ये सापडला आहे.