Pratik Gandhi: ‘कॉलर पकडून मुंबई पोलिसांनी गोदामात ढकललं’; ‘स्कॅम 1992’ फेम प्रतीक गांधीसोबत घडला प्रकार

| Updated on: Apr 25, 2022 | 9:11 AM

'स्कॅम 1992' या वेब सीरिजमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता प्रतीक गांधीचं (Pratik Gandhi) एक ट्विट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये प्रतीकने मुंबई पोलिसांकडून (Mumbai police) अपमान झाल्याचं म्हटलंय.

Pratik Gandhi: कॉलर पकडून मुंबई पोलिसांनी गोदामात ढकललं; स्कॅम 1992 फेम प्रतीक गांधीसोबत घडला प्रकार
Pratik Gandhi
Image Credit source: Instagram
Follow us on

‘स्कॅम 1992’ या वेब सीरिजमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता प्रतीक गांधीचं (Pratik Gandhi) एक ट्विट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये प्रतीकने मुंबई पोलिसांकडून (Mumbai police) अपमान झाल्याचं म्हटलंय. व्हीआयपी मूव्हमेंटदरम्यान (VIP security) रस्त्यावरून चालताना मुंबई पोलिसांनी आपला अपमान केल्याचं प्रतीकने या ट्विटमध्ये सांगितलंय. इतकंच नाही तर पोलिसांनी त्याला एका गोदामात ढकलल्याचंही त्याने सांगितलं. प्रतीकच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘व्हीआयपी सुरक्षेमुळे मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे जाम झालं होतं. शूटिंगच्या लोकेशनवर पोहोचण्यासाठी मी रस्त्यावरून चालायला लागलो तेव्हा पोलिसांनी माझ्या खांद्याला धरून मला कुठल्यातरी गोदामात ढकललं’, असं त्याने म्हटलंय.

प्रतीक गांधींच्या या ट्विटवर यूजर्स कमेंट करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आहेत म्हणून असं घडलं असावं, असं एका युजरने लिहिलं. त्यावर प्रतीकने लिहिलं, ‘अरेरे, मला माहित नव्हतं’. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिल्या ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्काराने रविवारी सन्मानित करण्यात आलं. मुंबईतील माटुंगा इथल्या षण्मुखानंद सभागृहात हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. याच कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले होते. मीना खडीकर-मंगेशकर, उषा मंगेशकर, आशा भोसले आणि आदिनाथ मंगेशकर यांनी मोदींना मानपत्र आणि स्मृतिचिन्ह प्रदान केलं.

प्रतीक गांधीच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास तो लवकरच महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. यामध्ये प्रतीक ज्योतिराव फुले यांची तर अभिनेत्री पत्रलेखा सावित्रीबाई यांची भूमिका साकारणार आहे. ‘फुले’ असं या चित्रपटाचं नाव आहे. अनंत महादेवन यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे.

हेही वाचा:

KGF 2: थांबायचं न्हाय आता थांबायचं न्हाय! 11 दिवसांत ‘केजीएफ 2’च्या कमाईचा थक्क करणारा आकडा

जिच्यासाठी विल स्मिथने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात केला राडा; तीच घेणार घटस्फोट?