पायात स्लिपर, अंगात गुलाबी ड्रेस, राधिकाच्या ‘फ्रॉग’वाल्या फोटोमध्ये दडलंय काय ?

. राधिका सोशल मीडियावर सक्रिय असते. सध्या तिच्या पायात स्लिपर आणि अंगात सेक्सी गुलाबी ड्रेस घातलेल्या एका फोटोची चांगलीच चर्चा रंगली आहे. राधिकाचा हा फोटो पाहून अनेकांना वेगवेगळे प्रश्न पडले आहेत.

पायात स्लिपर, अंगात गुलाबी ड्रेस, राधिकाच्या फ्रॉगवाल्या फोटोमध्ये दडलंय काय ?
RADHIKA APTE
| Edited By: | Updated on: Jul 28, 2021 | 12:07 AM

मुंबई : अत्यंत कमी वेळात बॉलिवडूमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री राधिका आपटेचा चाहता वर्ग बराच मोठा आहे. तिच्या दमदार अभिनयाला तोड नाही. राधिका सोशल मीडियावर सक्रिय असते. सध्या तिच्या पायात स्लिपर आणि अंगात सेक्सी गुलाबी ड्रेस घातलेल्या एका फोटोची चांगलीच चर्चा रंगली आहे. राधिकाचा हा फोटो पाहून अनेकांना वेगवेगळे प्रश्न पडले आहेत. (Radhika Apte wearing slippers and short pink stunning dress frock photo went viral on social media)

राधिका हात पसरून एका बेडकाच्या पुतळ्याशेजारी बसली

राधिका चाहत्यांसाठी तिचे वेगवेगळे फोटो नेहमीच अपलोड करते. तिच्या काही फोटोंमुळे तिचे चाहते घायाळ होतात. तर काही फोटोंमुळे नेटकऱ्यांना वेगवेगळे प्रश्नदेखील पडतात. सध्या व्हायरल होणाऱ्या फोटोबाबातही तेच झाले आहे. या फोटोमध्ये राधिका हात पसरून एका बेडकाच्या स्टॅच्यूशेजारी बसली आहे. यावेळी तिने पायात एक स्लिपर घातली असून तिच्या अंगात गुलाबी रंगाचा मनमोहक ड्रेस आहे. तिचा हा लूक अनेकांना आवडला आहे.

मी एका बेडकासारखी दिसते. तुम्ही कोणत्या प्राण्यासारखे दिसता ?

राधिका बेडकाच्या पुतळ्याशेजारी अशी का बसली आहे ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याचे उत्तर राधिकाने फोटोतील कॅप्शनमध्ये दिले आहे. आपण सगळे प्राणी आहोत. मी एका बेडकासारखी दिसते. तुम्ही कोणत्या प्राण्यासारखे दिसता ? असा सवाल तिने तिच्या चाहत्यांना केलाय.

राधिकाच्या या फोटोला लाखोंनी लाईक

या फोटोतील राधिकाची अदा नेटकऱ्यांना चांगलीच आवडली आहे. राधीकाचा हा फ्रॉग लूक चांगलाच भाव खाऊन गेला असून या फोटोची सगळीकडे चर्चा सुरु आहे. या फोटोला आतापर्यंत 2 लाख 94 हजार लोकांनी लाईक केले असून तिच्या हजारो चाहत्यांनी मजेदार कमेट्स केल्या आहेत. विशेष म्हणजे राधिकाची स्लिपर आणि गुलाबी ड्रेसची विशेष चर्चा होत आहे.

इतर बातम्या :

‘मेडल जिंकलं तर भारतीय, अन्यथा चिंकी-चायनीज-नेपाळी-कोरोना म्हणून ओळखतात’, मिलिंद सोमणची पत्नी अंकिता संतापली!

20 सप्टेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नाही, शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा!

अभिनेत्री श्वेता तिवारीने शेअर केले ग्लॅमरस फोटो, वयाच्या 40व्या वर्षीही सुंदर दिसते अभिनेत्री!

(Radhika Apte wearing slippers and short pink stunning dress frock photo went viral on social media)