AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मेडल जिंकलं तर भारतीय, अन्यथा चिंकी-चायनीज-नेपाळी-कोरोना म्हणून ओळखतात’, मिलिंद सोमणची पत्नी अंकिता संतापली!

अंकिताने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अंकिताने ईशान्येतील लोकांशी भेदभाव करणाऱ्यांवर आपला राग व्यक्त केला आहे.

‘मेडल जिंकलं तर भारतीय, अन्यथा चिंकी-चायनीज-नेपाळी-कोरोना म्हणून ओळखतात’, मिलिंद सोमणची पत्नी अंकिता संतापली!
अंकिता कोंवर
| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Jul 27, 2021 | 6:57 PM
Share

मुंबई : मीराबाई चानूने (Saikhom Mirabai Chanu) ‘टोकियो ऑलिम्पिक 2020’मध्ये  (Tokyo Olympic 2020) रौप्य पदक जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची मान उंचावली आहे. ईशान्य भारताच्या म्हणजेच मूळच्या मणिपूरच्या मीराबाईंच्या या विजयाबद्दल देशातील प्रत्येकाला अभिमान वाटतो. सध्या सोशल मीडियापासून ते प्रत्येक वृत्तपत्र आणि प्रत्येक घरापर्यंत तिच्या नावाची चर्चा आहे. परंतु, या सेलिब्रेशन दरम्यान, ईशान्य भारतातील लोकांसाठी काही लोकांच्या मनात दडलेल्या जातीवादाच्या भावनाकडे अजिबात दुर्लक्ष करता येणार नाही. मिलिंद सोमण (Milind Soman) यांची पत्नी अंकिता कोंवर (Ankita Konwar) यांनी आता या विषयावर आवाज उठवला आहे.

अंकिताने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अंकिताने ईशान्येतील लोकांशी भेदभाव करणाऱ्यांवर आपला राग व्यक्त केला आहे. अंकिताने लिहिले की, ‘तुम्ही ईशान्य भारतातील असाल तर देशासाठी पदक जिंकल्यासच तुम्ही भारतीय होऊ शकता. अन्यथा तुम्हाला चिंकी, चीनी, नेपाळी किंवा आता कोरोनाची नवीन आवृत्ती म्हणून ओळखले जाते. भारतात अनेक लोक जातीवादाने त्रस्त आहेत. हे मी माझ्या अनुभवातून सांगत आहे. # हायपोक्रिट्स’

पाहा अंकिताची पोस्ट :

अंकिताच्या मुद्यावर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

अंकिताच्या या पोस्टवर बर्‍याच जणांनी सहमती दर्शवली आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘हे खूप निराशाजनक आहे, भिन्न संस्कृती असूनही आपल्यात मानवतेची मूलभूत भावना कमी आहे.’  दुसर्‍याने लिहिले की, ‘हे अगदी खरे आहे, मला माहित आहे की अशा लोकांना आपलेच लोक बुली करतात आणि दुसरीकडे ब्लॅक लाईव्हसाठी संघर्ष करतात. हायपोक्रेसीला देखील काही मर्यादा आहेत.’ दुसर्‍याने लिहिले, ‘माझा देखील एक वर्गमित्र मणिपूरचा होता, भारतातील लोक त्याला कधीच भारतीय मानत नव्हते. मी ते अनुभवले आहे.  हे एक खुले आव्हान आहे, ज्याकडे कोणीही दुर्लक्ष करू शकत नाही. हे कटू सत्य आहे.

गुवाहाटीची मूळ रहिवासी असणारी अंकिता ही एकमेव नाही, जी या जातीवादाची व्यथा सांगत आहे. अ‍ॅक्सोन आणि ‘मेरी कोम’ या चित्रपटात सहाय्यक भूमिकेत झळकलेली मॉडेल-अभिनेत्री लिन लैशराम यांनीही यावर भाष्य केले होते.

‘या’ अभिनेत्रीनेही उठवला आवाज

मणिपूरमध्ये राहणारी अभिनेत्री लिन लैशराम म्हणाली की 2014मध्ये एका चित्रपटाच्या कास्टिंग दरम्यान भेदभाव करण्यात आला होता. एका मुलाखतीत लिन यांनी म्हटले होते की, ‘प्रियांकाने चित्रपटात खूप परिश्रम घेतले आहेत. परंतु, जर ईशान्येकडील किंवा मणिपुरी मुलीची निवड केली गेली असती, तर ती आमचे प्रतिनिधित्व करू शकली असती.’ लिन म्हणाली की, ‘जेव्हा ईशान्येकडील एखाद्या भूमिकेची भूमिका साकारण्याची वेळ येते तेव्हा ईशान्येकडील नसलेल्या व्यक्तीची निवड केली जाते, जसे ‘मेरी-कॉम’मध्ये घडले. तर दुसरीकडे, सामान्य भारतीयांप्रमाणे बॉलिवूड चित्रपटात ईशान्येकडील लोकांना घेतले जात नाही.’

(Milind Soman’s Wife Ankita Konwar calls out racism against people from the northeast indian)

हेही वाचा :

20 सप्टेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नाही, शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा!

Navarasa Trailer | नेटफ्लिक्ससह मणिरत्नमच्या तामिळ वेब सीरीजमध्ये ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीची एंट्री!

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या