Navarasa Trailer | नेटफ्लिक्ससह मणिरत्नमच्या तामिळ वेब सीरीजमध्ये ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीची एंट्री!

नुकताच सई ताम्हणकरचा 'मिमी' हा बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आता सई 'नेटफ्लिक्स' या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'नवरसा' या तमिळ सीरीजमध्ये देखील दिसणार आहे.

Navarasa Trailer | नेटफ्लिक्ससह मणिरत्नमच्या तामिळ वेब सीरीजमध्ये ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीची एंट्री!
Navarasa
Follow us
| Updated on: Jul 27, 2021 | 12:43 PM

मुंबई : मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर (Saie Tamhankar) सध्या खूपच चर्चेत आली आहे. मराठी चित्रपटांतून आपल्या नावचा झेंडा फडकवणारी अभिनेत्री सई ताम्हणकर ‘समांतर 2’ या वेब सीरीजच्या घवघवीत यशाचा आनंद साजरा करत आहे. नुकताच सई ताम्हणकरचा ‘मिमी’ हा बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आता सई ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘नवरसा’ या तमिळ सीरीजमध्ये देखील दिसणार आहे.

या तमिळ वेब सीरीजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये सीरीजमध्ये नऊ वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या कथा दाखवण्यात येणार आहेत. त्यातीलच एका कथेत सई ताम्हणकारची भूमिका असणार आहे. ‘नवरसा’च्या ट्रेलरमध्ये सईची छोटीशी झलक पहायला मिळाली आहे.

पाहा ट्रेलर :

मणिरत्नम यांची ओटीटीवर एंट्री

ज्येष्ठ चित्रपट निर्माते मणिरत्नम आपल्या दमदार सिनेमासाठी प्रसिद्ध आहेत. सिनेमा जगात उत्कृष्ट चित्रपट मानल्या जाणार्‍या अशा अनेक चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन व निर्मिती केली आहे. आता मणिरत्नम पुन्हा एकदा एका दमदार प्रोजेक्टसह ओटीटीवर आले आहेत. या वेब सीरीजमध्ये दक्षिणात्य सिनेमाचे ज्येष्ठ अभिनेते आणि अभिनेत्री असतील, जे या प्रोजेक्टला आणखी उंचावर नेतील. अलीकडेच ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने मणिरत्नम यांच्या ‘नवरसा’ वेब सीरीजचा टीझर रिलीज केला आहे, ज्यात अनेक नामांकित अभिनेते आणि अभिनेत्री दिसत आहेत.

कशी आहे कथा?

‘नव’ म्हणजे 9 आणि ‘रसा’ म्हणजे मानवी भावना अर्थात राग, करुणा, धैर्य, द्वेष, भीती, हशा, प्रेम, शांती आणि आश्चर्य. मणिरत्नमचा नवा प्रकल्प ‘नवरसा’मध्ये  मानवाच्या या 9 भावनांवर प्रकाश टाकला जाणार आहे. 9 जुलै रोजी नेटफ्लिक्सने या प्रोजेक्टचा टीझर लाँच केला आहे. या व्हिडीओमध्ये सूर्या (Suriya), सिद्धार्थ (Siddharth), प्रकाश राज (Prakash Raj), विजय सेतुपति (Vijay Setupathi), रेवती (Revathi), ऐश्वर्या राजेश (Aishwarya Rajesh) इत्यादी बरेच कलाकार दिसतात. ही सर्व पात्र या व्हिडीओमध्ये खूपच जबरदस्त दिसत आहेत.

टीझर रिलीज होताच सोशल मीडियावर एकच कल्लोळ निर्माण झाला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडीओ केवळ यूट्यूबवरच नव्हे तर इंस्टाग्रामवरही पाहिला आहे. ‘नवरसा’ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. नुकताच नेटफ्लिक्सने या कल्पित कथाच्या 9 कथांचा पहिला लूक आपल्या सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये सर्व कलाकार अतिशय दमदार लूकमध्ये दिसले आहेत. विशेष म्हणजे या प्रोजेक्टमधून होणारी कमाई मनोरंजन विश्वातील गरजू तंत्रज्ञ मंडळीना दिली जाणार आहे.

(Navarasa Trailer Marathi Actress Saie Tamhankar entering in tamil industry)

हेही वाचा :

Ani Kay Hava : जुई आणि साकेत लवकरच भेटीला, ‘आणि काय हवं’च्या तिसऱ्या सीझनची घोषणा

Binge Watch : ‘चुट्ज़पाह’ ते शिल्पा शेट्टीच्या ‘हंगामा 2’पर्यंत, ओटीटीवर प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची ‘विकेंड’ मेजवानी!

Bigg Boss OTT | यावेळी शोमध्ये असा कंटेंट असणार जो टीव्हीवर होईल बॅन, ‘बिग बॉस ओटीटी’ची धमाकेदार घोषणा!

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.