Raj Kundra case : 30-40 अ‍ॅप्स, शेकडो अश्लील व्हिडीओ, भलं मोठं भांडार मुंबई पोलिसांच्या हाती, राज कुंद्रांचा पाय खोलात

| Updated on: Jul 20, 2021 | 12:24 PM

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या पोलीसांच्या गुन्हे शाखेकडून त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे.

Raj Kundra case : 30-40 अ‍ॅप्स, शेकडो अश्लील व्हिडीओ, भलं मोठं भांडार मुंबई पोलिसांच्या हाती, राज कुंद्रांचा पाय खोलात
राज कुंद्रा
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या पोलीसांच्या गुन्हे शाखेकडून त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे. दिवसभराच्या चौकशीनंतर गुन्हे शाखेनं अटक केली आहे.

यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु झाली असून, पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या दरम्यान पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे लागले आहेत.

एका कंपनीच्या माध्यमातून अनेक अ‍ॅप्सची निर्मिती

या तपासादरम्यान राज कुंद्राने एका कंपनीच्या माध्यमातून 30 ते 40 अ‍ॅप्सची निर्मिती केलेली असल्याचे, उघडकीस आले आहे. या कंपन्यांवर काही दिवस स्वतः डायरेक्टर म्हणून काम पाहायचा आणि नंतर राजीनामा देऊन आपलाच एखादा म्होरक्या त्या पदावर बसवायचा. तपासा दरम्यान ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या शेकडो अश्लील व्हिडीओसचा डेटा मुंबई पोलिसांच्या हाती लागला आहे. ज्यावरून राज कुंद्रा यांच्याविरोधात सबळ पुरावे हाती लागलेत. या प्रकरणात आणखी 2 मॉडेल गुन्हे शाखेच्या रडारवर असल्याची माहिती समोर येत आहे.

काय आहे प्रकरण?

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra) याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत होता. अभिनेत्री गहना वशिष्ठला (Gehana Vasisth) अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत पोहोचले.

गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्राचे नातेवाईक प्रकाश बक्षी यूकेमध्ये राहतात. त्यांची यूके स्थित केनरिन (Kenrin) प्रॉडक्शन हाऊस नावाची कंपनी देखील आहे. प्रकाश बक्षी चेअरमन असलेल्या या कंपनीचे राज कुंद्रा पार्टनरही आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या कुंद्रा या कंपनीचा मालक आणि गुंतवणूकदार आहे. राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत हा केनरिन प्रॉडक्शन हाऊसचा भारतातील प्रतिनिधी होता. ही कंपनी अनेक एजंट्सना अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्याचे कंत्राट आणि आर्थिक सहाय्य देत असल्याचा आरोप आहे.

मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्राने या अश्लील चित्रपट बनवण्याच्या उद्योगात सुमारे 8 ते 10 कोटींची गुंतवणूक केली होती. तसेच, या व्हिडीओंचे शूटिंग भारतात करण्यात आले आणि त्यानंतर वी-ट्रान्सफर मार्गे यूकेला हस्तांतरित केले गेले.

(Raj Kundra case Mumbai police found 30 to 40 apps and hundreds of obscene video)

संबंधित बातम्या

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती, प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक, कारण काय?

अभिनेत्री गहना वशिष्ठच्या चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत, शिल्पा शेट्टीचा नवरा अश्लील चित्रपट प्रकरणात कसा सापडला?