Raj Kundra Case | ‘हॉट-शॉट’ गुगल प्लेस्टोरवर आणण्याची तयारी, अडचणी आल्यास काय करणार? पाहा राज कुंद्राचा ‘प्लॅन-बी’

| Updated on: Jul 21, 2021 | 1:14 PM

प्रदीप बक्षी याच्याशी व्हॉट्सअॅप चॅटमध्ये गुगल प्लेने आपल्या स्टोअरमधून राज कुंद्राचे हॉटशॉट अॅप काढून टाकल्यानंतर देखील राज कुंद्रा नवीन योजना आखत असल्याचे समोर आले आहे.

Raj Kundra Case | ‘हॉट-शॉट’ गुगल प्लेस्टोरवर आणण्याची तयारी, अडचणी आल्यास काय करणार? पाहा राज कुंद्राचा ‘प्लॅन-बी’
राज कुंद्रा
Follow us on

मुंबई : अश्लील चित्रपट प्रकरणात एक नवीन खुलासा समोर आला आहे. हॉटशॉट अ‍ॅप निलंबित झाल्यानंतर राज कुंद्राने (Raj Kundra) प्लॅन बी बनवला होता. प्रदीप बक्षी याच्याशी व्हॉट्सअॅप चॅटमध्ये गुगल प्लेने आपल्या स्टोअरमधून राज कुंद्राचे हॉटशॉट अॅप काढून टाकल्यानंतर देखील राज कुंद्रा नवीन योजना आखत असल्याचे समोर आले आहे. राज कुंद्राने सगळा बोल्ड कंटेंट काढून Play Store वर पुन्हा हॉटशॉट सुरू करण्याची तयारी केली होती. गुगल प्लेने संपर्क साधलेल्या मेलचा तपशीलही या चॅटमध्ये आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना अश्लील चित्रपट बनवण्याच्या प्रकरणात एस्प्लानेड कोर्टाने 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मंगळवारी क्राईम ब्रांचची टीम त्याला भायखळा तुरुंगात नेत असताना, तो निराश दिसत होता. या दरम्यान राज कुंद्रा यांनी प्रश्नांची उत्तरेदेखील दिली नाहीत. मुंबई पोलेस अनेकवेळा भायखळा येथे आरोपींना ठेवतात आणि येथूनच त्यांची चौकशी केली जाते.

कारवाईला इतका वेळ का लागला?

तथापि, हा प्रश्न उपस्थित होत आहे की 4 फेब्रुवारी रोजी या प्रकरणात प्रथम तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी इतका वेळ का घालवला? असे म्हटले जात आहे की, लवकरच राज कुंद्राच्या या संपूर्ण व्यवसायाचे मॉडेल समोर येणार आहे आणि यामुळे आपला हा व्यवसाय लपवण्यासाठी तो काय करत होता, हे देखील स्पष्ट होईल.

तक्रारीनंतर प्रकरण उघड

या संपूर्ण प्रकरणात मुंबई पोलिसांनी 4 फेब्रुवारी रोजी या प्रकरणात पहिला गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात एक मुलगी मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्यात पोहोचली होती आणि तिने या अश्लील रॅकेटबद्दल तक्रार दाखल केली होती. तक्रारीत मुलींनी चित्रपट आणि ओटीटीमध्ये काम मिळण्याच्या नावाखाली अश्लील चित्रपटात काम करण्यासाठी कशी सक्ती करतात, हे सांगितले होते.

अश्लील चित्रपट शूटिंगवर धाड

यानंतर पोलिसांनी मालाड वेस्ट भागातील एका बंगल्यावर छापा टाकला, ज्याला व्यावसायिकांकडून अश्लील चित्रपटांच्या शूटिंगसाठी भाड्याने दिले जात होते. या छाप्यात बॉलिवूड अभिनेत्रीसह 11 जणांना अटकही करण्यात आली. पोलिसांना इथून राज कुंद्रा आणि त्याच्या अश्लील कंपनी बद्दलचा सुगावा लागल्याचे समजते. मात्र, सबळ पुरावे नसल्याने पोलिसांना कारवाई करता आली नाही.

(Raj Kundra Case raj kundra have plan B for hot shot app to comeback on play store)

हेही वाचा :

‘त्या अ‍ॅपसाठी त्याने मलाही संपर्क केला होता’, युट्यूबर पुनीत कौरचे राज कुंद्रावर गंभीर आरोप

Raj Kundra Case Update : सचिन वाझेंमुळे राज कुंद्राची अटक पाच महिन्यांपासून लांबणीवर, जाणून घ्या पूर्ण प्रकरण