Rakhi Sawant : राखी सावंतनं सलमान खान, सोहेल खान आणि विकास गुप्ता यांना बांधली राखी, शेअर केला खास व्हिडीओ

| Updated on: Aug 24, 2021 | 12:52 PM

अभिनेत्री राखी सावंत बॉलिवूड अभिनेता सलमान खानला आपला भाऊ मानते.  यावर्षी रक्षा बंधनाच्या निमित्तानं तिनं तिच्या भावाला राखी बांधली आहे. (Rakhi Sawant tied Rakhi to Salman Khan, Sohail Khan and Vikas Gupta, shared special video)

Rakhi Sawant : राखी सावंतनं सलमान खान, सोहेल खान आणि विकास गुप्ता यांना बांधली राखी, शेअर केला खास व्हिडीओ
Follow us on

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध ड्रामा क्वीन अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) बॉलिवूड अभिनेता सलमान खानला आपला भाऊ मानते.  यावर्षी रक्षा बंधनाच्या निमित्तानं तिनं तिच्या भावाला राखी बांधली आहे. राखी सावंत संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये फक्त 3 लोकांना आपला भाऊ मानते, त्यापैकी एक सलमान खान, दुसरा सोहेल खान आणि तिसरा बिग बॉस 14 फेम विकास गुप्ता आहे. राखी सावंतनं राखीच्या दिवसाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती सांगते की सलमान खान आणि सोहेल खान त्यांच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी परदेशात गेले आहेत. मात्र राखीच्या निमित्तानं फक्त विकास तिच्यापर्यंत पोहोचला होता.

हा व्हिडीओ शेअर करताना राखी सावंतनं लिहिलं, “माझे भावांना सलमान खान, सोहेल खान, विकास गुप्ता यांना राखीच्या खूप खूप शुभेच्छा… तुम्ही तिघांनीही प्रत्येक कठीण काळात मला साथ दिली. यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. ” या व्हिडीओमध्ये विकास गुप्ता राखीला भेटायला आला आहे. राखी सुद्धा पूर्णपणे तयार आहे. राखीनं आरतीसाठी एक प्लेटही तयार केली आहे. विकास इथे पोहोचल्यानंतर राखी सलमान आणि सोहेलच्या फोटोंना टिलक लावते. या दरम्यान, तिच्या व्हिडीओमध्ये, ती सांगते की सलमान खान आणि सोहेल खाननं तिला प्रत्येक कठीण काळात मदत केली आहे. मात्र या क्षणी ते दोघं रशियामध्ये त्यांच्या टायगर 3 या चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. ज्यामुळे ती त्यांना राखी बांधू शकणार नाही.

पाहा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये दिसत आहे. विकास गुप्ताबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणते की, तू मुंबईत आहेस, म्हणून मी तुला निश्चितपणे राखी बांधणार आहे, विकास आणि राखीच्या जोडीनं बिग बॉस 14 मध्ये एक मोठा धडाका लावला. जे प्रेक्षकांनाही खूप आवडले. यामुळे ही जोडी आता अनेकदा एकत्र दिसतात. राखीनं आधीच सांगितलं आहे की तिच्या आईच्या उपचाराचा सर्व खर्च सलमान खान आणि सोहेल खान यांनी एकत्र केला होता. ज्यामुळे तिला कधीही कशाचीही अडचण आली नाही. अशी बातमी आहे की लवकरच राखी अनेक चित्रपटांमध्ये देखील दिसू शकते. अनेक अभिनेत्रींना बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर अनेक मोठे शो देखील ऑफर केले गेले आहेत.

संबंधित बातम्या

Ranveer Singh Dance : दीपिका पादुकोणसमोर पती रणवीर सिंगचा भन्नाट डान्स, हा व्हिडीओ पाहाच

Monalisa : भोजपुरी क्विन मोनालिसाची मालदीव सफर, नवऱ्यासोबत फोटो शेअर

Kamaal R Khan : केआरकेचा नवा दावा म्हणाला, ‘अक्षय कुमार लवकरच अफगाणिस्तानवर चित्रपट बनवणार’