Ranveer Singh Dance : दीपिका पादुकोणसमोर पती रणवीर सिंगचा भन्नाट डान्स, हा व्हिडीओ पाहाच

नुकतंच, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणची एक वेगळी स्टाईल पाहायला मिळत आहे. पिंकविलानं आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात रणवीर सिंग पत्नी दीपिका पदुकोणसमोर नाचताना दिसत आहे. (Ranveer Singh Dance: Husband Ranveer Singh's crazy Dance In Front Of Deepika Padukone, Watch This Video)

Ranveer Singh Dance : दीपिका पादुकोणसमोर पती रणवीर सिंगचा भन्नाट डान्स, हा व्हिडीओ पाहाच

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंगची (Ranveer Singh) जोडी चाहत्यांमध्ये खूप पसंत केली जात आहे. रणवीर आणि दीपिका हे बॉलिवूडमधील सर्वोत्तम जोडप्यांपैकी एक मानले जातात. हे पती-पत्नी नेहमीच एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. अशा परिस्थितीत नुकतंच या जोडप्याचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांनी एकमेकांना बराच काळ डेट केल्यानंतर लग्न केलं. हा व्हिडीओ रणवीरच्या आईच्या वाढदिवसाचा आहे.

रणवीर सिंगचा भन्नाट डान्स

नुकतंच, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणची एक वेगळी स्टाईल पाहायला मिळत आहे. पिंकविलानं आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात रणवीर सिंग पत्नी दीपिका पदुकोणसमोर नाचताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये दीपिका पदुकोण सोफ्यावर बसलेली दिसत आहे, तर रणवीर सिंग तिच्यासमोर टोपी घालून नाचताना दिसतोय. हो व्हिडीओ पाहून असे वाटतंय की जणू तो आपल्या पत्नीला समजावण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र तुम्ही पुढे पाहाल की रणवीरच्या नृत्यानंतरही, पत्नी दीपिका कशी तांडव करताना दिसतेय.

पाहा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

एवढंच नाही तर रणवीर आणि दीपिका व्हिडीओमध्ये त्या व्यक्तीशी बोलतानाही दिसत आहेत. व्हिडीओवरून हे स्पष्ट झालं आहे की हे रणवीर सिंगच्या आईच्या वाढदिवसाच्या पार्टीचा व्हिडीओ आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही चाहते रणवीरच्या या स्टाईलचं कौतुक करत आहेत, तर काही लोक त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत. एका युजरनं लिहिलं आहे की, तुम्ही वॉर डान्सरसारखे दिसताय.

रणवीर आणि दीपिकाच्या प्रेमाची सुरुवात रामलीला या चित्रपटापासून झाली. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. या दोन्ही स्टार्सनी 2018 मध्ये इटलीमध्ये लग्न केले.

संबंधित बातम्या

‘शेरशाह’ पाहून कमल हासनही सिद्धार्थ-कियाराचे झाले फॅन, म्हणाले…

Kamaal R Khan : केआरकेचा नवा दावा म्हणाला, ‘अक्षय कुमार लवकरच अफगाणिस्तानवर चित्रपट बनवणार’

Tejashree Pradhan : ‘टीव्हीची लाडकी सून’ तेजश्री प्रधानचं सोज्वळ रुप, पाहा खास फोटो

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI