Siddhanth Kapoor: रेव्ह पार्टीत श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत काय करत होता? Video आला समोर

जवळपास 35 जण या पार्टीत होते आणि त्यापैकी सहा जणांची ड्रग्ज टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. या सहा जणांमध्ये सिद्धांतचाही समावेश आहे. आता या रेव्ह पार्टीतील व्हिडीओ समोर आला आहे.

Siddhanth Kapoor: रेव्ह पार्टीत श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत काय करत होता? Video आला समोर
Siddhanth Kapoor video
Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Jun 13, 2022 | 3:35 PM

बेंगळुरूमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या रेव्ह पार्टीदरम्यान (rave party) अभिनेते शक्ती कपूर (Shakti Kapoor) यांचा मुलगा सिद्धांत कपूरला (Siddhanth Kapoor) ताब्यात घेण्यात आलं आहे. जवळपास 35 जण या पार्टीत होते आणि त्यापैकी सहा जणांची ड्रग्ज टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. या सहा जणांमध्ये सिद्धांतचाही समावेश आहे. आता या रेव्ह पार्टीतील व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये सिद्धांत डीजे वाजवताना दिसत आहे, तर पार्टीतील इतर लोक त्यावर नाचताना पहायला मिळत आहेत. पार्टीत ड्रग्जचं सेवन केलं जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानंतर त्यांनी या हॉटेलवर धाड टाकली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आणखी एका व्हिडीओमध्ये पोलीस हॉटेलमधील इतर लोकांसोबत बोलताना दिसत आहेत. “काल रात्री आम्हाला हॉटेलमध्ये होत असलेल्या पार्टीबाबत माहिती मिळाली होती. त्या हॉटेलमध्ये धाड टाकून आम्ही 35 लोकांना ताब्यात घेतलं होतं. आम्हाला त्याठिकाणी कोणतेही ड्रग्ज मिळाले नाहीत पण MDMA आणि गांजा हे वापरून फेकून दिल्याचं तिथे जवळच आढळलं. आम्ही सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करू”, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पहा व्हायरल व्हिडीओ 1-

पहा व्हायरल व्हिडीओ 2-

मुलाला ताब्यात घेतल्याचं कळताच शक्ती कपूर यांची प्रतिक्रिया-

याप्रकरणी शक्ती कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी सध्या फक्त एकच गोष्ट बोलू शकतो की हे शक्य नाही. मी सध्या मुंबईत आहे आणि तिथे काय घडतंय याची मला काहीच कल्पना नाही. मला फक्त वृत्तवाहिन्यांमधूनच माहिती मिळतेय. माझ्या मते कोणतीही अटक झालेली नाही आणि सिद्धार्थला फक्त ताब्यात घेतलंय,” असं ते म्हणाले. सिद्धांत हा रविवारी मुंबईहून बेंगळुरूला गेला होता. रविवारी रात्री उशिरा झालेल्या पार्टीदरम्यान ही घटना घडली. सिद्धांत कोणत्या हॉटेलमध्ये थांबला होता, याबद्दलची माहिती कपूर कुटुंबीयांना नव्हती.

सिद्धांतसुद्धा बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून काम करत आहे. त्याने काही चित्रपट आणि वेब शोमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सिद्धांत हा डीजेसुद्धा आहे. 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भागम भाग’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटासाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. ‘चुप चुपके’, ‘भुल भुलैय्या’, ‘ढोल’ यांसारख्या चित्रपटांसाठीही त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. अभिनेता म्हणून त्याने 2013 मध्ये ‘शूटआऊट ॲट वडाला’ या चित्रपटातून पदार्पण केलं.