Siddhanth Kapoor: ड्रग्ज प्रकरणी मुलाला ताब्यात घेतल्यानंतर शक्ती कपूर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

बेंगळुरूमध्ये झालेल्या एका रेव्ह पार्टीतून सिद्धांतला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या पार्टीत त्याने ड्रग्जचं सेवन केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आता शक्ती कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Siddhanth Kapoor: ड्रग्ज प्रकरणी मुलाला ताब्यात घेतल्यानंतर शक्ती कपूर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
Shakti KapoorImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 10:22 AM

अभिनेते शक्ती कपूर (Shakti Kapoor) यांचा मुलगा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर (Siddhanth Kapoor) वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बेंगळुरूमध्ये झालेल्या एका रेव्ह पार्टीतून सिद्धांतला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या पार्टीत त्याने ड्रग्जचं सेवन केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आता शक्ती कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी सध्या फक्त एकच गोष्ट बोलू शकतो की हे शक्य नाही”, असं ते ‘ई टाइम्स’शी बोलताना म्हणाले. एम. जी. रोडवरील एका हॉटेलमध्ये ड्रग्जचा वापर होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी त्या हॉटेलवर छापा टाकला. ड्रग्जचं सेवन केलं की नाही हे तपासण्यासाठी तिथल्या काही जणांची चाचणी (drugs test) करण्यात आली. यावेळी इतर सहा जणांसोबत श्रद्धा कपूरच्या भावाचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला.

सिद्धांत हा रविवारी मुंबईहून बेंगळुरूला गेला होता. रविवारी रात्री उशिरा झालेल्या पार्टीदरम्यान ही घटना घडली. सिद्धांत कोणत्या हॉटेलमध्ये थांबला होता, याबद्दलची माहिती कपूर कुटुंबीयांना नव्हती. ज्या सहा जणांनी ड्रग्जचं सेवन केलं, त्यात सिद्धांतही होता, अशी माहिती बेंगळुरू पोलिसांनी दिली. “सिद्धांत कपूरच्या ड्रग्ज चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याला उल्सूर पोलीस ठाण्यात आणलं गेलंय”, असं बेंगळुरू शहरचे डीसीपी डॉ. भीमाशंकर म्हणाले.

हे सुद्धा वाचा

सिद्धांत कपूर पोलिसांच्या ताब्यात-

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्ज प्रकरणाचा तपास करताना 2020 मध्ये एनसीबीने अभिनेत्री श्रद्धा कपूरचीशी चौकशी केली होती. त्यावेळी श्रद्धाने सुशांतच्या पवना इथल्या गेस्ट हाऊसमधील पार्टीला हजर राहिल्याचं कबूल केलं होतं. मात्र त्या पार्टीत ड्रग्जचं सेवन केलं नसल्याचं तिने स्पष्ट केलं. सुशांत आणि श्रद्धाने ‘छिछोरे’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळाल्यानंतर ही पार्टी आयोजित करण्यात आली होती.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.