ट्विटरचे नवे सीईओ पराग अग्रवालांसोबत गायिका श्रेया घोषालचं खास नातं! 10 वर्षांपूर्वीचे ट्वीट्स व्हायरल…

| Updated on: Dec 02, 2021 | 12:09 PM

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) हिची गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडिया कंपनी ट्विटरने पराग अग्रवाल (Parag Agarwal) यांची नवीन सीईओ म्हणून नियुक्ती केली, तेव्हापासून दोघांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

ट्विटरचे नवे सीईओ पराग अग्रवालांसोबत गायिका श्रेया घोषालचं खास नातं! 10 वर्षांपूर्वीचे ट्वीट्स व्हायरल...
Shreya Ghoshal-Parag Agrwal
Follow us on

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) हिची गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडिया कंपनी ट्विटरने पराग अग्रवाल (Parag Agarwal) यांची नवीन सीईओ म्हणून नियुक्ती केली, तेव्हापासून दोघांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अगदी तेव्हापासूनच अनेक लोकांनी श्रेया घोषालला ट्विटरवर फॉलो करण्यास देखील सुरुवात केली आहे. काही लोकांनी दशकभर जुने ट्विट रीशेअर करून श्रेया आणि पराग यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.

पराग अग्रवाल आणि श्रेया घोषाल हे बालपणीचे मित्र आहेत. ही गोष्ट श्रेयाने दहा वर्षांपूर्वी ट्विटरवर सांगितली होती. पण, त्यानंतरही लोक तिचे आणि परागचे जुने ट्विट पुन्हा उकरून वेगवेगळ्या गोष्टी बोलू लागले आहेत. पराग अग्रवाल यांनी 30 मे 2011 रोजी एक ट्विट केले आहे, ज्यात त्यांनी श्रेया घोषालच्या ट्विटला उत्तर देताना लिहिले की, ‘श्रेया घोषाल, लाँग ड्राईव्हवर मला नेहमी तुझी आठवण येते… आता काय चालले आहे?’ सुमारे 10 वर्षांपूर्वी केलेल्या आणखी एका ट्विटमध्ये परागने लिहिले की, ‘श्रेया घोषाल सुंदर डीपी. कशी आहेस’

पराग अग्रवालचे हे ट्विट सीईओ झाल्यानंतर व्हायरल होऊ लागले. याबद्दल लोक त्यांना नावे ठेवू लागले आहे. काही लोक त्यांना ‘मेन विल बी मेन’ म्हणत आहेत. काही जण पराग यांना उद्देशून म्हणाले की, ‘ट्विटरचे नवे सीईओ देसी सिंप आहे’. ‘सिंप’ म्हणजे एकतर्फी प्रेमात असलेला व्यक्ती!

श्रेया घोषालचं ट्रोल्स सणसणीत उत्तर!

पराग अग्रवालच्या जुन्या ट्विटमुळे ट्रोल होत असलेल्या श्रेया घोषालला अखेर यावर रिप्लाय द्यावा लागला. मंगळवारी 30 नोव्हेंबरच्या रात्री तिने या संपूर्ण प्रकरणावर एक ट्विट केले. यामध्ये तिने अतिशय नम्रपणे लोकांना समजावून सांगितले आणि त्यांना फटकारले देखील आहे. या ट्विटमध्ये तिने लिहिले की, ‘अरे यार, तुम्ही लोक आमच्या बालपणीचे ट्विट शेअर करत आहात. तेव्हा ट्विटर नुकतेच सुरू झाले होते. 10 वर्षांपूर्वी आम्ही खूप लहान होतो. मित्र एकमेकांना ट्विट करू शकत नाहीत का? हा काय टाईमपास चालला आहे?

श्रेयाच्या या उत्तराचे नेटकऱ्यांकडून कौतुक

श्रेया घोषालच्या या ट्विटचे लोक जोरदार कौतुक करत आहेत. बहुतेक ट्विटर युजर्स तिच्या पाठीशी उभे असल्याचे दिसले. निखिल नावाच्या एका युजरने लिहिले आहे की, ‘हे ट्विटरवर आहे, इथे टाईमपास होतो, गांभीर्याने घेऊ नका.’

श्रेयाच्या ट्विटला उत्तर देताना एक युझर लिहितो, ‘ हीकिती लाजिरवाणी गोष्ट आहे की, त्यांना याचे स्पष्टीकरण द्यावे लागले! लोकांना कधी थांबावे हे कळतच नाही का?’

दुसऱ्या युजरने श्रेयाच्या उत्तराचे कौतुक केले आणि लिहिले, ‘किती चांगल्या पद्धतीने हाताळलेस हे सगळे… कोणताही अवास्तव मुद्दा न बनवता योग्य पद्धतीने ट्रोलिंगला हलक्यातच घेतले. म्हणूनच, आम्ही श्रेया घोषालचे नेहमी कौतुक करतो.’

हेही वाचा :

Video | Oops Moment! चाहत्यांचे आभार मानत होती गायिका अन् अचानक खांद्यावरून ड्रेसच निसटला!

Happy Birthday Boman Irani | वेटर ते फोटोग्राफर, 42व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत बोमन इराणी बनले सुपरस्टार!

</h4>