Seema Sajdeh | मला स्त्रिया आवडतात; ‘या’ अभिनेत्याच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा

सीमा तपारियाची प्रतिक्रिया पाहून सजदेह जोरजोरात हसायला लागली. सीमा तपारिया म्हणाल्या की, तिचे उत्तर ऐकून मला खरोखरच धक्का बसला, मात्र मी जेंव्हा लग्नाच्या प्रश्नाबद्दल तिला विचारले, तेंव्हा तिला नक्कीच टेन्शन आले होते.

Seema Sajdeh | मला स्त्रिया आवडतात; या अभिनेत्याच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा
| Edited By: | Updated on: Sep 03, 2022 | 11:52 AM

मुंबई : ‘इंडियन मॅचमेकिंग’ फेम सीमा तपारिया नेटफ्लिक्सच्या वेब सीरिज (Web series) ‘फॅब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलीवूड वाइव्हज’ सीझन 2 मध्ये दिसत आहे. नुकतेच महीप कपूरने इंस्टाग्रामवर (Instagram) एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये नीलम कोठारी सीमा तपारिया आणि सोहेल खानची एक्स वाईफ सीमा सजदेह दिसत आहेत. हा फोटो सध्या सोशल मीडियावर (Social media) प्रचंड व्हायरल होत आहे. आता सोशल मीडिया यूजर्सही या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत. यावेळी सीमा तपारिया यांनी सीमा सजदेह यांना एक अत्यंत महत्त्वाचा त्यांच्या लग्नाविषयी प्रश्न विचारला, ज्याचे उत्तर सीमा सजदेह यांच्याकडून ऐकून प्रत्येकालाच मोठा धक्का बसलायं.

इथे पाहा महीप कपूरने केलेली पोस्ट

सीमा सजदेह यांनी केला धक्कादायक खुलासा

सीमा तपारिया यांनी 22 वर्षांनंतर लग्न का तुटले हा प्रश्न सीमा सजदेह यांना विचारला असता. या प्रश्नावर उत्तर देताना सीमा सजदेह म्हणाल्या की, आमचे विचार जुळत नव्हते. सीमा तपारिया पुढे म्हणाल्या की, हे कळायला 22 वर्षे का लागली? हे ऐकून सीमा सजदेह नाराज झाल्या आणि म्हणाल्या की, मी खरे सांगते…मला पुरूषांपेक्षा अधिक स्त्रीया आवडतात…सीमा सजदेहचे हे उत्तर ऐकल्यानंतर सीमा तपारिया यांना मोठा धक्काच बसला.

हे कळायला 22 वर्षे का लागली?

सीमा तपारियाची प्रतिक्रिया पाहून सजदेह जोरजोरात हसायला लागली. सीमा तपारिया म्हणाल्या की, तिचे उत्तर ऐकून मला खरोखरच धक्का बसला, मात्र मी जेंव्हा लग्नाच्या प्रश्नाबद्दल तिला विचारले, तेंव्हा तिला नक्कीच टेन्शन आले होते. या दोघींचे बोलणे ऐकून महीपने सांगितले की सीमा सजदेहसाठी सीमा तापरिया ‘वधू’ शोधू शकतात. यावर तपारिया म्हणाल्या की, ‘मी हे करू शकत नाही, भारतात इतकं मुक्त वातावरण नाहीये…