Jhalak Dikhhla Jaa 10 : आजपासून सुरू होणार डान्सचा महा हंगामा…जाणून घ्या ‘झलक दिखला जा 10’ शो कधी आणि कुठे पाहू शकता..

झलक दिखला जाने पाच वर्षांपूर्वी टीआरपीमध्ये काही खास कमाल न करता आल्याने मोठा ब्रेक घेतला. पण आता हा शो चाहत्यांच्या मागणीनुसार परत एकदा सुरू करण्यात आलायं. यावेळी टीआरपीमध्ये शो नेमकी काय जादू करणार हे बघण्यासारखेच ठरणार आहे.

Jhalak Dikhhla Jaa 10 : आजपासून सुरू होणार डान्सचा महा हंगामा...जाणून घ्या 'झलक दिखला जा 10' शो कधी आणि कुठे पाहू शकता..
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Sep 03, 2022 | 9:58 AM

मुंबई : कलर्स टीव्हीचा सुप्रसिध्द डान्स रिअॅलिटी शो ‘झलक दिखला जा 10’ (Jhalak Dikhhla Jaa 10) आज 3 सप्टेंबरपासून सुरू होत आहेत. हा शो तब्बल 5 वर्षांनी पुनरागमन करत आहे, यामुळे चाहत्यांमध्ये उत्साह बघायला मिळतोयं. माधुरी दीक्षित, करण जोहर (Karan Johar) आणि नोरा फतेही शोमध्ये जज असणार आहेत. रुबिना दिलैक, निया शर्मा असे टीव्ही इंडस्ट्रीतील (TV industry) अनेक दिग्गज या शोमध्ये सामील होणार आहेत. मनीष पॉल हा शो होस्ट करणार आहे. सर्व चाहते त्यांच्या आवडत्या कलाकारांना डान्स करताना पाहण्याासाठी उत्सुक आहेत. रूबिनाच्या चाहत्यांमध्ये अधिक उत्साह बघायला मिळतो, कारण खतरो के खिलाडी शो करून रूबिका आता झलक दिखला जा मध्ये दिसणार आहे.

झलक दिखला जा कलर्स टीव्हीवर दर शनिवारी आणि रविवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार

झलक दिखला जा 3 सप्टेंबरपासून कलर्स टीव्हीवर दर शनिवारी आणि रविवारी प्रसारित होईल. रात्री 8 वाजल्यापासून प्रेक्षकांना हा रिअॅलिटी शो टीव्हीवर पाहता येणार आहे. हा शो कलर्स टीव्हीवर लाईव्ह टीव्ही तसेच व्होट सिलेक्टद्वारेही पाहता येणार आहे. झलक दिखला जा मधील बिग बॉस 11 ची विजेती शिल्पा शिंदे, अनुपमा फेम पारस कालनावट, धीरज धूपर, अमृता खानविलकर, नीती टेलर, रुबिना दिलैक, निया शर्मा, शेफ झोरावार, डान्सर गुंजन, टिक-टॉकर फैझू, अली असगर हे दिसणार आहेत.

हे सुद्धा वाचा

यंदा टीआरपीमध्ये काय चमत्कार होणार हे बघण्यासारखे ठरणार…

झलक दिखला जाने पाच वर्षांपूर्वी टीआरपीमध्ये काही खास कमाल न करता आल्याने मोठा ब्रेक घेतला. पण आता हा शो चाहत्यांच्या मागणीनुसार परत एकदा सुरू करण्यात आलायं. यावेळी टीआरपीमध्ये शो नेमकी काय जादू करणार हे बघण्यासारखेच ठरणार आहे. यंदा शोमध्ये फेमस स्टारला घेण्यात आले असून त्यांचा चाहता वर्ग देखील जास्त आहे. यामुळे टीआरपीमध्ये यावेळी शो टाॅपमध्ये राहिले असे सांगितले जात आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें