Kamaal R. Khan | KRK च्या जामीन अर्जावर या दिवशी होणार सुनावणी, तोपर्यंत राहावे लागणार तुरुंगातच…

कमाल आर खानला 2020 मध्ये अपमानास्पद ट्विट केल्याबद्दल ताब्यात घेण्यात आले आहे. अक्षय कुमार आणि बॉलिवूड निर्माते-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्यावर वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी केआरकेला अटक करण्यात आलीयं.

Kamaal R. Khan | KRK च्या जामीन अर्जावर या दिवशी होणार सुनावणी, तोपर्यंत राहावे लागणार तुरुंगातच...
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 10:18 AM

मुंबई : कमाल आर खान (Kamaal R. Khan) सध्या अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. मुळात म्हणजे केआरके आणि वाद हे समिकरण जुनेच आहे. वादग्रस्त भाषा आणि ट्विटमुळे अनेकदा केआरके यांना प्रचंड ट्रोल केले जाते. दोन वर्षांपूर्वी केलेल्या ट्विटमुळे केआरके सध्या अडचणीत सापडले आहेत. 29 ऑगस्टला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) केआरकेला विमानतळावरून अटक केली होती. त्यानंतर त्यांना दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र, असे असतानाही त्यांच्या वकिलाच्या (Lawyer) वतीने जामीन अर्ज दाखल करण्यात आला असता, न्यायालयाने त्यांच्या जामिनावर सुनावणी न घेता सोमवार 5 सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे, म्हणजेच काय तर केआरकेला काही दिवस अजून तुरूंगातच राहवे लागणार आहे.

केआरकेला वादग्रस्त ट्विट प्रकरण भोवण्याची शक्यता

कमाल आर खानला 2020 मध्ये अपमानास्पद ट्विट केल्याबद्दल ताब्यात घेण्यात आले आहे. अक्षय कुमार आणि बॉलिवूड निर्माते-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्यावर वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी केआरकेला अटक करण्यात आलीयं. शुक्रवार 2 सप्टेंबर रोजी बोरिवली न्यायालयात त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती. परंतु वकील जय यादव यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली असून ही सुनावणी सोमवार 5 सप्टेंबरपर्यंत तारीख वाढवली आहे.

हे सुद्धा वाचा

14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

कमाल आर खानला बोरिवली दंडाधिकारी न्यायालयाने 30 ऑगस्ट 2022 रोजी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. मात्र, केआरकेने छातीत दुखत असल्याची तक्रार केली. यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर 1 सप्टेंबरच्या रात्री परत आर्थर रोड कारागृहात हलवण्यात आले. जिथे त्यांना 2 सप्टेंबरला सोडण्यात येईल अशी अपेक्षा होती. मात्र, तसे काही होऊ शकले नाहीयं.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.