RRR Benchmarks: 100 कोटी क्लबमध्ये RRRची धमाकेदार एण्ट्री; राजामौलींच्या चित्रपटाने रचले नवे विक्रम

| Updated on: Mar 30, 2022 | 12:13 PM

एस. एस. राजामौली (SS Rajamouli) दिग्दर्शित RRR या चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत कमाईचा 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. ज्युनियर एनटीआर आणि रामचरण यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने (RRR hindi benchmarks) आतापर्यंत 107.59 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

RRR Benchmarks: 100 कोटी क्लबमध्ये RRRची धमाकेदार एण्ट्री; राजामौलींच्या चित्रपटाने रचले नवे विक्रम
RRR
Image Credit source: Twitter
Follow us on

एस. एस. राजामौली (SS Rajamouli) दिग्दर्शित RRR या चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत कमाईचा 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. ज्युनियर एनटीआर आणि रामचरण यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने (RRR hindi benchmarks) आतापर्यंत 107.59 कोटी रुपयांची कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात हा बिग बजेट चित्रपट ‘बाहुबली: द बिगनिंग’च्या संपूर्ण कलेक्शनचा आकडा पार करणार असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिली आहे. जगभरातील या चित्रपटाच्या पहिल्या वीकेंडची कमाई ही तब्बल 490 कोटी रुपये इतकी झाली आहे. के.व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीचा 1920 चा काळ या चित्रपटात दाखवला गेला आहे. अल्लुरी सीताराम राजू (रामचरण) आणि कोमाराम भीम (ज्युनियर एनटीआर) या दोन क्रांतिकारकांभोवती ही कथा फिरते. इतिहासातील ही दोन महत्त्वाची नावं जरी घेतली असली तरी चित्रपटाची संपूर्ण कथा ही काल्पनिक आहे. (Box Office Collection)

RRR हिंदीची कमाई-

शुक्रवार- 20.07 कोटी रुपये
शनिवार- 24 कोटी रुपये
रविवार- 31.50 कोटी रुपये
सोमवार- 17 कोटी रुपये
मंगळवार- 15.02 कोटी रुपये
एकूण- 107.59 कोटी रुपये

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शचं ट्विट-

RRR हिंदीने रचलेले विक्रम

      1. कमाईचा 100 कोटींचा टप्पा पार करणारा एस. एस. राजामौली यांचा हा तिसरा चित्रपट ठरला आहे.
      2. ‘बाहुबली: द बिगनिंग’च्या संपूर्ण कमाईचा आकडा RRR हा पहिल्या आठवड्यातच पार करणार आहे.
      3. कोरोना महामारीनंतर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी 100 कोटींच्या क्लबमध्ये एण्ट्री करणारा हा सहावा चित्रपट ठरला आहे.
      4. याआधी सूर्यवंशी, 83, पुष्पा, गंगुबाई काठियावाडी आणि द काश्मीर फाईल्स या चित्रपटांनी 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.

हेही वाचा:

RRRवरून आलियाचं राजामौलींसोबत वाजलं; रागाच्या भरात डिलिट केले चित्रपटाचे सर्व पोस्ट

जॅकी श्रॉफ यांच्या मनाची श्रीमंती; निधनाचं वृत्त समजताच घरगड्याच्या घरी सांत्वनाला पोहोचले